Tiger Shroff Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger Shroff News: टायगर श्रॉफ महाभारतात साकारणार हनुमानाची भूमिका? अभिनेत्याचं उत्तर एकूण नेटकरीही शॉक

Tiger Shroff Video: टायगरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यामध्ये ‘तुला कोणत्या सुपरहिरोचे पात्र साकारायला आवडेल?’ असा प्रश्न विचारला.

Chetan Bodke

Tiger Shroff Viral Video: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ नेहमीच त्याच्या फिटनेससाठी चर्चेत असतो. नेहमीच टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस, डान्स आणि ॲक्शन सीनमुळे अनेकदा चर्चेत असतो. हिरोपंती मधुन प्रकाश झोतात आलेल्या टायगरने फार कमी दिवसातच बॉलिवूडध्ये वेगळी ओळख निर्माण केली.

त्याने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक जबरदस्त ॲक्शन सीन्स दिलेय. आणि त्याच ॲक्शन सीन्स मुळे अभिनेता अनेकदा प्रकाशझोतात आला. सध्या टायगरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याला तुला कोणत्या सुपरहिरोचे पात्र साकारायला आवडेल? असा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर ऐकून सगळेच थक्क झाले.

सध्या टायगरचा २०१७मधील एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय, त्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्याला चित्रपटात कोणत्या सुपरहिरोची भूमिका करायला आवडेल असे विचारले असता, त्याचे उत्तर ऐकून सगळेच थक्क झाले. सध्या सोशल मीडियावर टायगरचा ७ वर्ष जुना व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. व्हिडीओत टायगर ‘स्पायडरमॅन : होमकमिंग’चे प्रमोशन करताना दिसत आहे. त्या मार्वेल चित्रपटात टायगरने स्पायडर मॅनच्या भूमिकेसाठी आवाज दिला होता.

टायगर श्रॉफला असा प्रश्न विचारला, तुला कोणत्या सुपरहिरोची भूमिका साकारायची आहे? किंवा तुला 'क्रिश' सारख्या बॉलिवूड सुपरहिरोच्या चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल का? या प्रश्नावर टायगर श्रॉफ म्हणतो, “बॉलिवूडमध्ये कधी महाभारत बनले तर मला हनुमान किंवा रामची भूमिका करायला आवडेल.”

सध्या टायगरचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी टायगरला चांगलेच ट्रोल केलेय, तर काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे. त्याला नेटकरी कमेंट करत म्हणतात, “टायगरने कदाचित रीलमध्येच महाभारत पाहिलं असेल.” तर काहींना टायगरची व्हिडीओ पाहून आदिपुरुषची आठवण झाली आहे.

तर पुढे आणखी एक युजर म्हणतो, “ते बॉलिवूडवाले लोक आहेत, काहीही करु शकतात.” तर आणखी एकाने युजरने कमेंट केली, “महाभारतात हनुमान आहेत. भीमचा अहंकार तोडण्यासाठी वानराच्या रूपात कृष्णाजींनी त्यांना अर्जुनाच्या रथावर बसण्याची विनंती केली होती.” अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट त्या पोस्टवर येत आहेत.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याने ‘हिरोपंती’, ‘मुन्ना मायकल’ आणि ‘बागी’मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. लवकरच टायगर श्रॉफचा अक्षय कुमारसोबत ‘गणपत’ आणि नंतर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

SCROLL FOR NEXT