Tiger 3 | सलमानचा हा लुक बघुन तुम्ही त्याला ओळखणार देखील नाही, पहा फोटो Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Tiger 3 | सलमानचा हा लुक बघुन तुम्ही त्याला ओळखणार देखील नाही, पहा फोटो

बॉलिवुडचा दबंग स्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी टायगर ३ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटींगसाठी तो रशीयाला गेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवुडचा (Bollywood) दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी टायगर ३ (TIger 3) या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटींगसाठी (Shooting) तो रशीयाला (russia) गेला आहे. काही दिवसांपुर्वीच त्याचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो रशीयात सध्या शुटींगमध्ये व्यस्त असून त्याच्यासोबत त्याची को-स्टार कतरीना कैफही (Katrina kaif) आहे. एका चाहत्याने सलमान खानचे शुटींगदरम्यानचे फोटोज् व्हायरल केले आहेत. यात सलमान खान रशियम लुकमध्ये असून त्याला ओळखणंही कठीण झालंय. (Tiger 3 | You won't even recognize Salman Khan by looking at this look)

हे देखील पहा -

सलमान खानच्या या नव्या लुकमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. लाल रंगाचे डेनिम जॅकेट, सफेद रंगाचा टी - शर्ट, ब्ल्यू रंगाची जिन्स आणि बियर्ड यांमुळे सलमान हुबेहुब रशीयन दिसतोय. त्यामुळे टायगर ३ मध्ये सलमान रशीयन का बनला, याबद्दल चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. टायगर या सुपरहीट सिरीजचा तिसरा चित्रपट टायगर ३ या सिनेमासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात बॉलिबुडचा सिरीअल किस्सर इमरान हाश्मी (Imran Hashmi) देखील आहे. तो यात खलनायकाची भुमिका बजावतोय. त्यासाठी त्याने जिममध्ये प्रचंड घाम गाळला आहे.

२०१६ मध्ये आलेला टायगर, त्यानंतर २०१७ मध्ये आलेला टायगर जिंदा है या दोन सुपरहीट चित्रपटांनंतर आता टायगर ३ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टायगर ३ या सिनेमाचे शूटिंग रशिया, टर्की, युरोप या देशात होणार असून तब्बल 40 दिवसांचे शेड्युल आहे. त्यानंतर सलमान मुंबईत परतून बिग बॉस 15 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT