Protest Against Hallmarking | आज हॉलमार्कींग विरोधात देशभरातील ज्वेलर्स संपावर... (पहा व्हिडिओ)
Protest Against Hallmarking | आज हॉलमार्कींग विरोधात देशभरातील ज्वेलर्स संपावर... (पहा व्हिडिओ)Saam Tv

Protest Against Hallmarking | आज हॉलमार्कींग विरोधात देशभरातील ज्वेलर्स संपावर... (पहा व्हिडिओ)

पुण्यात आज दिवसभर सराफ पेढ्या राहणार बंद
Published on

पुणे : १६ जूनपासून रत्न आणि दागिने उद्योगावर अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्यात आले आहे. मात्र, खूपच समस्या अद्याप सोडवले नाहीत. भारतीय मानक ब्युरोने बीआयएस BIS दागिन्यांच्या शुद्धतेच्या ४ प्रमाणित शिक्क्यांमध्ये अचानक बदल करत असताना ज्वेलरी उद्योगाच्या संस्थांबरोबर चर्चाही देखील केली नाही. याविरोधात महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने सोमवारी राज्यभर लाक्षणिक संप पुकारण्यात आलेला आहे.

पहा व्हिडिओ -

देशात हॉलमार्किंग केंद्रांच्या कमतरतेने भारतभर हॉलमार्किंगची अंमलबजावणी अशक्य आहे. यामुळे संपूर्ण उद्योग आणि मूल्य साखळी विस्कळीत होत असल्याने, आणि लाखो लोकांचे जीवनमान धोक्यात येत आहे, असे महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी यावेळी सांगितले आहे.

Protest Against Hallmarking | आज हॉलमार्कींग विरोधात देशभरातील ज्वेलर्स संपावर... (पहा व्हिडिओ)
"शेंटीमेंटल" अशोक सराफ यांची खास मुलाखत 

या आहेत, फेडरेशनच्या मागण्या

-हॉलमार्किंग विक्रीच्या ठिकाणी लागू असावे.

-नागरी स्वरूपाच्या गुन्ह्याकरिता नोंदणी रद्द करण्याची तरतूद उद्योगासाठी हानिकारक ठरू शकणार आहे.

-१० लाखांपर्यंत दंड, तुरुंगवास आणि परवाना रद्द केल्यामुळे, इन्स्पेक्टर राज ची बळावण्याची भीती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com