Suraj Chavan: टिकटॉक स्टार 'गोलीगत' आता चित्रपटात झळकणार Saam TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan: टिकटॉक स्टार 'गोलीगत' आता चित्रपटात झळकणार

सुरज चव्हाण हा आपल्या SQRQZQ, गोलीगत आणि 'बुक्कीत टेंगुळ' या त्याच्या डायलॉगने तो खूपच फेमस झाला होता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : टिकटॉक स्टार (TickTok Star) सुरज चव्हाण आता पडद्यावरती झळकणार आहे कारण सुरजला आता चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या अनोख्या अंदाजात आणि बोबड्या भाषेमुळे तो सोशल मिडियावरती (Social Media) चांगलाच फेमस झाला आहे. टीकटॉक या अॅपमुळे सर्वांसमोर आलेला हा सुरज बारामती तालुक्यातील मोडवे गावचा रहिवासी आहे.

SQ RQ ZQ, गोलीगत आणि 'बुक्कीत टेंगुळ' या त्याच्या डायलॉगने तो खूपच फेमस झाला. आणि त्याच्या या वेगळ्या बोलीमुळे त्याला ओळखत नाही असा तरुण वर्ग अपवदानेच असेल आणि हिच त्याची प्रसिद्धी त्याच्या कामाला आली आहे. कारण सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता 'का रं देवा' या चित्रपटात काम करत असून. या चित्रपटात सूरज कॉलेजमधील मुलाची भूमिका साकारीत आहे.सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या अंतर्गत प्रशांत शिंगटे हा चित्रपट बनवीत आहेत.

टिकटॉकने मला रातोरात मोठे केलं

सुरज हा लहानपणापासूनच बोबडा बोलतो मात्र त्याचे हे बोबडे बोलणंच त्याच्या कामाला आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने लोकांना आपलंसं केलं. दरम्यान टिकटॉकने (TicTok) मला रातोरात मोठे केलं आणि मी जगभरात पोहचलो. प्रशांत शिंगटेजी मला भेटायला घरी आले आणि मला त्यांनी सिनेमाची ऑफर दिली तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. लिहिता व वाचता न येणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला एक निर्माता शोधत घरापर्यंत पोहचतो ही कल्पनाच मी करू शकत नव्हतो असं सुरजने सांगितलं. दरम्यान हा मराठी चित्रपट (Marathi Film) येत्या फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT