Shivsena: 'महाराष्ट्राच्या बाहेरच्या चॅनेलने मराठी कलाकारांचा सन्मान ठेवावा, अन्यथा...!'

shambhuraj desai supports marathi actor kiran mane
shambhuraj desai supports marathi actor kiran manesaam tv

सातारा : महाराष्ट्रच्या बाहेरच्या चॅनेलने आमच्या कलाकारांवर अन्याय केला तर ताे आम्ही कदापी सहन करणार नाही असा इशारा गृहराज्यमंत्री शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी अभिनेते किरण माने यांना मूलगी झाली हाे या मालिकेतून एका वाहिनीने बेदखल केल्यानंतर दिला आहे. देसाईंनी (shambhuraj desai) अभिनेते किरण माने (kiran mane) यांनी त्या संदर्भात तक्रार केल्यास निश्चित आम्ही चॅनेलवर कार्यवाहीचे आदेश देऊ असे स्पष्ट केले. (shambhuraj desai supports marathi actor kiran mane)

shambhuraj desai supports marathi actor kiran mane
Kamal Khan: पत्रकार कमाल खान यांच्या निधनाची बातमी अस्वस्थ करणारी; देशातील नेत्यांची भावना

‘मुलगी झाली हो’ या मराठी मालिकेतून अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना काढून टाकण्यात आल्यानंतर राज्यातील जनता समाज माध्यमातून माने यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. जनतेबराेबरच राज्यातील नेते देखील किरण माने यांना पाठींबा दर्शवित आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), आमदार राेहित पवार (rohit pawar) यांनी ट्विट करुन त्यांचे परखड मत व्यक्त केले आहे.

साता-यात (satara) गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले समाज माध्यमातून व्यक्त हाेणे हा ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा भाग आहे. किरण माने यांनी त्यांचे मत व्यक्त करताना काेणावरही पक्षावर अथवा पक्षाचे नाव घेऊन टिका टिप्पणी केलेली नाही अशी मला प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. किरण माने यांनी याबाबत तक्रार केली तर राज्य सरकार चाैकशी करेल आणि याेग्य ताे निर्णय घेईल अशी ग्वाही देखील मंत्री देसाई यांनी दिली.

edited by : siddharth latkar

shambhuraj desai supports marathi actor kiran mane
#istandwith_KiranMane: सर्वांनी सत्यासोबत उभे राहणे हाच खरा संवैधानिक धर्म : राेहित पवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com