सातारा : केवळ मत व्यक्त केले म्हणून अभिनेते किरण माने यांना मालिकेतून बाहेर पडावे लागले हे सत्य असेल तर मग आपण सर्वांनी देखील सत्यासोबत उभे राहणे हाच खरा संवैधानिक धर्म आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांशी होणारी छेडछाड मूकपणे पाहणे किमान महाराष्ट्रात तरी शोभणारे नाही असे परखड मत आमदार राेहित पवार यांनी व्यक्त केले आहे. (mla rohit pawar supports actor kiran mane)
‘मुलगी झाली हो’ या मराठी मालिकेतून अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना काढून टाकण्यात आलं आहे. या प्रकारानंतर राज्यातील जनता समाज माध्यमातून माने यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. जनतेबराेबरच राज्यातील नेते देखील किरण माने यांना पाठींबा दर्शवित आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), आमदार राेहित पवार (rohit pawar) यांनी ट्विट करुन त्यांचे परखड मत व्यक्त केले आहे.
आमदार राेहित पवार लिहितात केवळ मत व्यक्त केले म्हणून अभिनेते किरण माने यांना मालिकेतून बाहेर पडावे लागले. हे सत्य असेल तर मग आपण सर्वांनी देखील सत्यासोबत उभे राहणे हाच खरा संवैधानिक धर्म आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांशी होणारी छेडछाड मूकपणे पाहणे किमान महाराष्ट्रात तरी शोभणारे नाही.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी;याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच म्हणावा लागेल.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.