Kirna Mane And Jitendra Awhad
Kirna Mane And Jitendra AwhadSaam Tv

कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही; जितेंद्र आव्हाडांचा किरण मानेंना पाठिंबा

या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे,निलु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा,हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही
Published on

मुंबई - मराठी मालिका ‘मुलगी झाली हो’ यामध्ये भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (Kiaran Mane) यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर राज्यात आता अनेक लोकांकडून माने यांना पाठिंबा मिळत आहे. दरम्यान यातच आता राज्यातील बडे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे. ट्विटद्वारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Jitendra awhad supported Kiran mane)

ट्विट करत ते म्हणले की, स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणुन अचानक मालिकेतुल काढुन टाकले गेले.

हे देखील पहा -

तसेच पुढे आणखी एक ट्विट करत ते म्हणले की, या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे,निलु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा,हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

दुसरीकडे किरण माने यांनी दोन ओळींची एक फेसबुक पोस्ट टाकत माघार घेणार नसल्याच स्पष्ट केलं आहे. त्यांनी काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !असे म्हणत आपलं व्यक्त केलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com