Zee Natya Gaurav Puraskar 2025 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Zee Natya Gaurav Puraskar: अतुल परचुरेंसाठी स्वर्गाचे दार उघडणार; झी नाट्य गौरवमध्ये आठवणींना उजाळा देणार, रंगकर्मींचा सन्मान होणार

Zee Natya Gaurav Puraskar 2025: यावर्षीचा ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५’ सोहळा हा खूप अविस्मरणीय असणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात अतुल परचुरे यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Zee Natya Gaurav Puraskar 2025: यंदाचा ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५’ सोहळा हा खूप अविस्मरणीय असणार आहे. या सोहळ्यात अनेक गोड सरप्राइझ या नाट्यगौरवच्या निमित्ताने रसिकांना पाहायला मिळणार आहेत. ‘अतुल तोडणकर’ आणि ‘अद्वैत दादरकर’ हे एक प्रवेश सादर करुन दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. तर,

झी मराठीच्या इंस्टाग्राम पेजवरील रील सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेता अतुल तोडणकर दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो. या व्हिडिओमध्ये अनेक कलाकार अतुल परचुरेंना पाहून भावूक झाल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अतुल परचुरे हे ज्येष्ठ लेखक कवी पु . ल. देशपांडे यांच्या स्वर्गातील घरी गेल्याचे दाखवण्यात आले आहे.

तसेच, या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५’मध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षीचे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी आहेत, प्रकाश बुद्धीसागर. मराठी रंगभूमीची आयुष्यभर सेवा करणारी अनेक नाटकवेडी माणसं आपण पाहिली असतील. पण मराठी रंगभूमी हेच ज्यांचं आयुष्य आहे असे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि रंगकर्मी म्हणजे ‘प्रकाश बुद्धीसागर’. एकांकिका आणि प्रायोगिक नाटकांच्या दिग्दर्शनापासून ते अनेक लोकप्रिय व्यावसायिक नाटकांच्या दिग्दर्शनापर्यंतचा त्यांचा हा प्रवास ह्या क्षेत्रात नव्याने काहीतरी करू पाहणाऱ्या प्रत्येक कलाकाराला प्रेरणा देणारा असाच आहे.

‘झी नाट्य गौरव २०२५’ जीवनगौरव पुरस्काराचे दुसरे मानकर ठरले लेखक, दिग्दर्शक, परीक्षक, समीक्षक पुरुषोत्तम बेर्डे. लेखक, दिग्दर्शक, परीक्षक, समीक्षक अशा अनेक भूमिका निभावणारे अष्टपैलू कलाकार म्ह्णून पुरुषोत्तम बेर्डे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. अशा अनेक कलाकारांचा सन्मान आणि अनेक आठवणींना उजाळा देणारा हा झी नाट्य गौरव २०२५ ३० मार्च रोजी संध्या. ६ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

Pune Tourism : मित्रांची साथ अन् बाईक राइड, वीकेंडला पाहा पुण्यातील 'हा' मनमोहक धबधबा

Maharashtra Politics : सोन्याचा चमचा अन् भरलेलं ताट, विधान परिषदेत एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली

Maharashtra Live News Update: माढा तालुक्यातील अरण गावतून शाळकरी मुलाचे अपहरण

Aadhaar Update: घरी बसून आधार कार्ड अपडेट करता येईल का? फोटो बदलण्याचे नियम समजून घ्या

SCROLL FOR NEXT