Sikandar: सलमान खानच्या सिकंदरचे तिकीट वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा महागडे; किंमत वाचून थक्क व्हाल

Sikandar Movie Ticket Price: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून, तिकीट दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
Salman Khan
sikandar Saam Tv
Published On

Sikandar Movie Ticket Price: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून, तिकीट दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मल्टिप्लेक्समध्ये प्रीमियम तिकिटांचे दर २२०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर सिंगल स्क्रीन थिएटरमध्येही रिक्लायनर सीट्ससाठी ७०० रुपये आकारले जात आहेत. सलमान खानच्या चाहत्यांचा उत्साह पाहता, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल, अशी अपेक्षा आहे.

सिकंदर’ चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग गुरुवारी सुरू झाली आणि अवघ्या २४ तासांत त्याने जवळपास ४ कोटी रुपये कमाई केली आहे. प्रदर्शनाला अजून दोन दिवस बाकी असताना, ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सलमान खानच्या चित्रपटांना नेहमीच थिएटरमध्ये ऑन द स्पॉट बुकिंगचा मोठा फायदा होतो, विशेषतः छोट्या शहरांमध्ये. त्यामुळे पहिल्या दिवसाची कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार, हा चित्रपट मजबूत ओपनिंगसाठी सज्ज झाला आहे.

Salman Khan
Sikander Advance Booking: 'छावा'ला 'सिकरंदर'ची टक्कर; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधूनच केली 'इतकी' कमाई

तिकीट दरांचा तडाखा

अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच बुकमायशो या वेबसाइटवर देशभरातील जवळपास सर्व थिएटरांसाठी बुकिंग खुली झाली. मुंबईतील दादर येथील प्लाझा सिनेमासारख्या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये संध्याकाळच्या शोसाठी रिक्लायनर सीट्सचे दर ७०० रुपये इतके ठेवण्यात आले आहेत. सिंगल स्क्रीन थिएटरसाठी हा दर नेहमी पेक्षा जास्त आहेत, विशेषतः मुंबईसारख्या शहरात.

Salman Khan
Raid 2 Teaser: पटनायक पुन्हा आला, १ मे रोजी टाकणार रेड; दादा भाई रितेशने भाव खाल्ला

मल्टिप्लेक्समध्येही ‘ब्लॉकबस्टर प्रायसिंग’चा वापर करून प्रीमियम तिकिटांचे दर वाढवले गेले आहेत. मुंबईतील मल्टिप्लेक्समध्ये ‘डायरेक्टर्स कट’ किंवा ‘लक्स’ तिकिटांचे दर २२०० रुपयांपर्यंत गेले आहेत. सामान्य मल्टिप्लेक्स सीट्सचे दरही मोठ्या शहरांमध्ये ८५० ते ९०० रुपये इतके आहेत. सलमान खानच्या चाहत्यांचा उत्साह पाहता, हे दरही त्यांना थांबवू शकलेले नाहीत.

‘सिकंदर’ चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, शरमन जोशी आणि सत्यराज यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ३० मार्च रोजी ईदच्या मुहूर्तावर जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियाडवाला यांच्या नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com