मुंबई : 'हेरा-फरी' आणि 'वेलकम' सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे निर्माते लवकरच 'महाभारत २.०'(Mahabharat 2.0) घेऊन येत आहेत. या चित्रपटाने भारतातील सर्वात महागड्या चित्रपट 'ब्रह्मास्त्र'चे बजेटही ती पार केले आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) हा चित्रपट ४१० कोटी रुपयांमध्ये बनला आहे. असे म्हटले जात आहे की दिग्दर्शक फिरोज नाडियादवाला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जबरदस्त चित्रपट बनवणार आहेत आणि त्याची कथा जवळपास ४ वर्षे चालणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'महाभारत २.०' डिसेंबर २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये डब होणार आहे. 'महाभारत २.०'चे ग्राफिक्स 'लॉर्ड ऑफ रिंग्स', 'गेम ऑफ थ्रोन्स', 'हॅरी पोर्टर', 'स्टार वॉर्स' यांसारख्या हॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटांशी स्पर्धा करणार असल्याचा दावा फिरोज नाडियाडवालाने केला आहे. या चित्रपटाचे ग्राफिक्स लॉस एंजेलिसमध्ये रेकॉर्ड केले जाणार आहेत. याशिवाय तिथली एक कंपनी VFX वर काम करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'महाभारत २.०' चित्रपटाचे बजेट ७०० कोटींहून अधिक असू शकते. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वात मोठा चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट 5D मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग असे अनेक बॉलिवूड सुपरस्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एवढेच नाही तर या चित्रपटात तुम्हाला नाना पाटेकर, अनिल कपूर आणि परेश रावल देखील दिसणार आहेत. या चित्रपटात सर्व पात्रे खूप महत्त्वाची आहेत, त्यामुळे निर्मात्यांना फक्त मोठ्या कलाकारांनाच कास्ट करायचे आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या कलाकारांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.