Marathi Celebrity In Chhatrapati Shivaji Maharaj: आज महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. अवघ्या महाराष्ट्रात आज छत्रपती शिवरायांचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मराठी मनोरंजन विश्वात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या पराक्रमावर आधारित अनेक सिनेमे आले आहेत.
चला तर एक नजर टाकूया कोणकोणत्या मराठमोळ्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
१) चंद्रकांत मांढरे
चंद्रकांत मांढरेंनी साकारलेली महाराजांची भूमिका आजही सर्वत्र प्रसिद्ध आहे. १९५२ साली हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला होता.
२) डॉ. अमोल कोल्हे
नितीन चंद्रकांत देसाई निर्मित 'राजा शिवछत्रपती' ही स्टार प्रवाह वरील मालिका. या मालिकेतून डॉ. अमोल कोल्हेंनी साकारलेली महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली.
३) शरद केळकर
तान्हाजी सिनेमात शरद केळकर यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका सर्वांनाच फार आवडली. संपूर्ण देशात शरद यांच्या साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं.
४) शंतनू मोघे
स्वराजरक्षक संभाजी मालिकेतून शंतनू मोघेंनी साकारलेले शिवाजी महाराज प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले.
५) चिन्मय मांडलेकर
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी शिवराज अष्टक सिनेमांची घोषणा केल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून आपल्या भेटीला आले.
६) गश्मीर महाजनी
प्रवीण तरडे दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका लोकप्रिय केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.