Upcoming Bollywood Movies 
मनोरंजन बातम्या

Bollywood Movies: बॉलिवूडचे 'हे' ७ चित्रपट बॉक्स ऑफिसमध्ये घालणार धुमाकूळ, पाहा लिस्ट

Upcoming Bollywood Movies: यावर्षी बॉलिवूडच्या काही चित्रपटांनी धुमाकूळ घातला. या चित्रपटांनी प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन केलं. यामुळे बॉलिवूडच्या चित्रपटाकडे प्रेक्षक पुन्हा वळू लागलेत.

Bharat Jadhav

सिनेरसिक बॉलिवूड चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. येत्या काही महिन्यांत अनेक चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. यामध्ये पुष्पा 2, सिंघम अगेन, जिगरा यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान पुढील वर्षात असे काही सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ज्यांची प्रेक्षक वाट पाहत आहेत. हे चित्रपट बॉलिवूडचे आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होत. त्यामुळे आता या चित्रपटांचा पुढील भागासाठी चाहते उत्सुक आहेत.

आज आपण अशाच ७ चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांच्या रिलीज डेटची घोषणा झाली नसेल पण जेव्हा हे चित्रपट प्रदर्शित होतील तेव्हा ते बॉक्स ऑफिसवर नक्कीच धमाल करतील. या यादीत कोणत्या चित्रपटांची नावे आहेत ते पाहू.

मस्ती ४

विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आणि अफताब शिवदासानी यांचा मस्ती या चित्रपटाचा ४ था भाग येणार आहे. या भागात या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीला बदलण्यात आलंय. पण हा सिनेमा कधी येणार याची तारीख अद्याप आलीय नाहीये.

तेरे इश्क में

दाक्षिणात्य अभिनेता धनुषचा बॉलिवूड चित्रपट 'रांझना' चांगलाच गाजला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनम कपूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. आता धनुषच्या 'तेरे इश्क में' या चित्रपटाचा सीक्वल रिलीज होणार आहे. यात तो शंकरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन दिसणार आहे.

धुरंधर

बॉलिवूडचा स्टायलिश अभिनेता रणवीर सिंहच्या चित्रपटाचं नावही या यादीत आहे. रणवीरचा धुरंधर या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर माधवन देखील दिसणार आहे. आदित्य धर हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट बनवत असून सिनेमाचं शूटिंग सुरू झाले आहे.

शूटआउट अॅट भायखळा

'शूटआऊट ॲट भायखळा' चित्रपटाची कथा 1900 मध्ये जेजे हॉस्पिटलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या कथेवर आधारित आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, फरदीन खान, जॉन अब्राहम, सैफ अली खान, संजय दत्त, सुनील शेट्टी आणि बॉबी देओल दिसणार आहे.

सोल्जर

बॉबी देओल आणि प्रिती झिंटा यांच्या हिट ठरलेला सोल्जर चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. पुढील वर्षापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. बॉबी आणि प्रिती झिंटा या चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार आहेत.

लाहौर १९४७

सनी देओल आणि प्रीति झिंटा यांच्या लाहौर १९४७ चित्रपटाची घोषणा करण्यात आलीय. हा चित्रपट आमिर खान यांच्या प्रोडक्शन कंपनीद्वारे निर्मित केला जात आहे. राजकुमार संतोषी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाची कथा १९४७ मध्ये झालेल्या फाळणीवर अवलंबून आहे.

द किंग

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा या वर्षात एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. मात्र पुढच्या वर्षी ‘द किंग’मधून पुनरागमन करणार आहे. गुरु आणि शिष्याच्या कथेवर आधारित या चित्रपटात त्याच्यासोबत मुलगी सुहाना खान देखील दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT