karan Johar and Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 7 : काही इन्फ्लुएन्सर्स विमानतळावर जातात, पण...; उर्फी जावेदवर निशाणा

असे काही इन्फ्लूएन्सर्स आहेत, जे नटूनथटून विमानतळावर जातात, मीडियाशी बोलतात, पण कधीही फ्लाइट पकडत नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॅालिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांमुळं सतत चर्चेत आहे. या लोकप्रिय शोमध्ये सेलिब्रिटींच्या 'पर्सनल टू प्रोफेशनल' लाईफबाबत अनेक खुलासे होत असतात. सध्या कॅाफी विथ् करण या शोचे सातवे पर्व सुरू आहे. या शोमध्ये अनेक दिग्गज मंडळीनी हजेरी लावली आहे. अलीकडेच सोनम कपूर(Sonam Kapoor) आणि अर्जुन कपूर(Arjun Kapoor) यांनी हे या शोमध्ये सहभागी झाले होते.

कॅाफी विथ करण या शोचा सातवा सीझन सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच शोमध्ये सोनम कपूर आणि अर्जुन उपस्थित होते. सोनम कपूर ही बॉलिवूडमधील फॅशन आयकॅान म्हणून ओळखली जाते. यामुळेच यावेळी अभिनेत्रीच्या फॅशन स्टाईलविषयी चर्चा करण्यात आली. दरवर्षी होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलवर देखील निशाणा साधण्यात आला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतातील अनेक अभिनेत्री रेड कार्पेटवर सौंदर्याची झलक दाखवण्यासाठी उपस्थिती दर्शवतात. त्यापैकी एक म्हणजे सोनम कपूर.

याचदरम्यान शोमध्ये सोनमला यंदाचा कान्स महोत्सव कसा वाटला?, असे विचारले असता, तुला कसा वाटला? असा प्रतिप्रश्न तिनं करणला केला. त्यावर मला काही विशेष वाटलं नाही, असं करणनं उत्तर दिलं. कोणाचा ड्रेस सर्वांत चांगला वाटला, असाही प्रश्न तिनं करणला विचारला. त्यावर करणने दीपिकाचे नाव घेतले.

याचवेळी करणने नाव न घेता उर्फी जावेदची खिल्ली उडवली. करण म्हणाला, की 'असे काही इन्फ्लूएन्सर्स आहेत, जे नटूनथटून विमानतळावर जातात, मीडियाशी बोलतात, पण कधीही फ्लाइट पकडत नाहीत.

उर्फी जावेदला अनेकदा विमानतळावर जाण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. नटूनथटून विमानतळावर का जाते? आणि विमानतळाबाहेर फोटो का काढते?, असं उर्फीला विचारण्यात आलं होतं. त्यावर, मी हवं ते करेन, नाचेन फिरेन, खेळेल, रडेल, कुठेही जाईल. केव्हाही जाईल, कोणासोबतही जाईल त्याच्याशी तुम्हाला काय? असं बिनधास्त उत्तर उर्फी जावेदने दिलं होतं. तसंच तिनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअरही केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT