Urfi Javed  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फी जावेदला धमकी; म्हणाली, 'मी कोणाला घाबरत नाही'

काही दिवसांपासून उर्फी जावेदला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं वृत्त आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अतरंगी फॅशनमुळं चर्चेत असलेली उर्फी जावेद(Urfi Javed) पुन्हा चर्चेत आली आहे. पण यावेळचं कारण वेगळंच आहे. काही दिवसांपासून उर्फी जावेदला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं वृत्त आहे. याबाबत तिनं स्वतः (Social Media) सोशल मीडिया अकाउंटवर धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

उर्फी जावेद ही तिच्या अनोख्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आहे. या माध्यमातून तिनं सोशल मीडिया जगतात आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. उर्फी अनेकदा तिच्या अतरंगी फॅशनमुळे प्रसिद्धीझोतात असते. पण आता उर्फी वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. काही दिवसांपासून उर्फीला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

उर्फी जावेदनं स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. काही दिवसांपासून उर्फीला सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलच्या स्टोरीवर शेअर केली आहे. उर्फीने याचे काही स्क्रीनशॉट शेअर केले असून, हा प्रकार उघड केला आहे.

उर्फीच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्री कोणीतरी तिला व्हिडीओ कॉल करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने फोन उचलला नाही, नंतर पुन्हा त्याच नंबरवरून उर्फीला गँगस्टर टिल्लू ताजपुरियाचा शार्प शूटरच्या अटकेचा व्हिडिओ पाठवला. त्यावर उर्फीने विचारले, कोण आहेत? मला असे व्हिडिओ का पाठवत आहे? दुसर्‍या स्क्रीन शॉटमध्ये उर्फी जावेदने लिहिले की ती कोणालाही घाबरत नाही. एक व्यक्ती तिच्यासोबत फोटो काढण्याची मागणी करत आहे. मात्र उर्फी त्याला बेधडकपणे नकार देताना या चॅटिंगमधून दिसून आले.

याआधीही उर्फी जावेदने सांगितले होते की, कोणीतरी तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. उर्फीने त्या व्यक्तीवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले होते की ही व्यक्ती पंजाबी इंडस्ट्रीशी संबंधित आहे, ज्याच्यासोबत तिने कामही केले आहे. पण तो बऱ्याच दिवसांपासून उर्फीला ब्लॅकमेल करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

SCROLL FOR NEXT