Bhool Bhulaiyaa 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया ३' मध्ये कियारा अडवाणी नसणार? 'ही' अभिनेत्री करणार कार्तिकसोबत रोमान्स

बॉलिवूडचा सध्याचा सुपरस्टार कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या 'भूल भुलैया २' या चित्रपटाने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा सध्याचा सुपरस्टार कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी(Kiara Advani) यांच्या 'भूल भुलैया २' या चित्रपटाने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. दोन महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या हॉरर-कॉमेडी चित्रपटात कियारा अडवाणी- कार्तिक आर्यनची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात कियाराला रिप्लेस करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'भूल भुलैया २' च्या यशनंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचा तिसरा भाग बनवण्याचे ठरवले आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट बिग बजेटमध्ये बनवायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या कथानकातही बदल करणार असल्याचे बोलले जात आहे. 'भूल भुलैया २' हा चित्रपट ९० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४० कोटींची कमाई केली होती.

रिपोर्ट्सनुसार, निर्माते 'भूल भुलैया ३' साठी दीपिका पदुकोणला कास्ट करण्याचा विचार करत आहेत. दीपिका पदुकोणशी अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून, निर्मात्यांनीही याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या चित्रपटात दीपिका पदुकोणची एन्ट्री झाली तर, चित्रपटात काही ना काही नवीन ट्वीस्ट प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळतील. त्याचबरोबर दीपिका पदुकोण आणि कार्तिक आर्यन ही जोडी देखील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसेल.

'भूल भुलैया'च्या पहिल्या भागात अक्षय कुमार, साहनी आहुजा, विद्या बालन आणि अमिषा पटेल या कलाकारांनी काम केलं होतं. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांसारखे सुपरस्टार दिसले होते. दोन्ही भागांच्या यशानंतर आता चाहते चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT