Kartik Aryan Image
Kartik Aryan Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

मुसळधार पावसात कर्तिकचा जबरा स्पोर्टी लूक; swag पाहून फॅन्सला 'किक'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता (Kartik Aryan) कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानंतर कार्तिक आर्यनच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कार्तिक हा सोशल मिडियावरून नेहमी काहीना काही पोस्ट करत असतो. आता पण त्याने त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कार्तिकने स्वतः त्याच्या(Instagram) इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. जो पाहून त्याचे चाहते खूप खुश झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये कार्तिक मुंबईच्या मुसळधार पावसात फुटबॉल खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याची एनर्जी आणि स्वॅग पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना कार्तिक आर्यनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पाऊस आणि फुटबॉल, दोन्ही माझ्या आवडत्या गोष्टी एकत्र'.

मुसळधार पावसात निळ्या रंगाची जर्सी घातलेला कार्तिक कसा मोठ्या जोमाने फुटबॉल खेळत आहे. हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ १५० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

सध्या कार्तिक आर्यन त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया २' या चित्रपटाच्या भरघोस यशाचा आनंद साजरा करत आहे. त्याच्या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. त्याच्या चित्रपटाचा उत्साह अजून कमी झालेला नाही. या चित्रपटात चाहत्यांना कार्तिक आर्यनचे काम खूप आवडले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा गल्ला केला आहे.

निर्मात्यांनी दिली लक्झरी कार भेट...

'भूल भुलैया २' च्या यशानंतर निर्माता भूषण कुमारने कार्तिक आर्यनला एक पॅाश ऑरेंज मॅक्लारेन लक्झरी कार भेट दिली. काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यनला त्याच्या नवीन पॅाश लक्झरी कारमधून फिरताना बघितले होते. माहितीनुसार, या कारची किंमत ३.७३ कोटी रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

Today's Marathi News Live : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT