Noor Malabika death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Noor Malabika Death : मुंबईत ३७ वर्षीय अभिनेत्रीनं संपवलं जीवन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

The Trial Fame Actress Noor Malabika Died: 'द ट्रायल' फेम अभिनेत्री नूर मलाबिका हिचा मृत्यू झाला आहे. नूर मलाबिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल नूर मलाबिकाचा मृत्यू झाला आहे. नूर मलाबिकाने स्वतः च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी ६ जून रोजी लोखंडवाला येथे एका फ्लॅटमधून तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. नूर मलाबिका ही फक्त ३७ वर्षांची होती. पोलिस याप्रकरणी तपासणी करत आहेत. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नूर मलाबिकाच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली होती. शेजारच्यांनी ही माहिती ओशिवरा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अभिनेत्रीच्या घराचा दरवाजा तोडला. आत गेल्यावर अभिनेत्रीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेला आढळून आला. पोलिसांनी ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच तिच्या घराची झडती घेतली आहे. त्यात तिचे गोळ्या-औषधे, मोबाईल फोन, डायरी जप्त करण्यात आली आहे.

गोरेगावच्या सिद्धार्थ हॉस्पिलमध्ये तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणीही समोर आले नाही. त्यामुळे बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या एनजीओच्या मदतीने अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ९ जूनला तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

नूर मलाबिका ही मूळची आसामची होती. तिने अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. नूर मलाबिकाने 'द ट्रायल' या वेबसीरीजमध्ये काजोल आणि जिशु सेनगुप्ता यांच्यासोबत दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

विहिरीत प्रेमीयुगुलांचा पाण्यात तरंगताना आढळला मृतदेह, पोलिसांना वेगळाच संशय, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT