Saam Tv
मनोरंजन बातम्या

Good Luck Jerry Trailer: ड्रग्ज विकायला निघाली जान्हवी कपूर, निरागस चेहऱ्यामागे लपलंय हे गुपित

जान्हवी कपूरच्या 'गुड लक जेरी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'गुड लक जेरी' २९ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'गुड लक जेरी'(Good Luck Jeery) या सिनेमाच्या पोस्टर आणि टीझरमुळे चर्चेत आहे. जान्हवीच्या 'गुड लक जेरी' या आगामी सिनेमाचा ट्रेलर काही वेळापूर्वीच रीलीज झाला आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जान्हवीने साकारलेल्या जया कुमारी उर्फ ​​जेरीची निरागसता पाहायला मिळत आहे.

'गुड लक जेरी' सिनेमाचा ट्रेलर खूपच मजेशीर आहे. जान्हवी कपूर म्हणजेच जेरी ही बिहारची असून कामाच्या शोधात पंजाबमध्ये आल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. तिची आई आजारी असते, म्हणून अनेक काम शोधून झाल्यानंतर शेवटी जेरी ड्रग्‍स विकणाऱ्या लोकांकडे काम मागण्यासाठी जाते. निरागस दिसणारा जेरी या कामात सहभागी होईल याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. पण एवढी निरागस दिसणारी जेरी हतबल होऊन या धंद्यात सामील होते की यामागचं कारण काही वेगळं आहे, हे उघड केलं नाही आहे.

दिग्दर्शक सिद्धार्थ सेन गुप्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आनंद एल. राय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जान्हवीचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट सिनेमागृहांऐवजी थेट २९ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

जान्हवीने कोरोनाच्या काळात पंजाबमध्ये या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. या शूटिंगदरम्यान तिला पंजाबमधील शेतकऱ्यांच्या विरोधालाही सामोरे जावे लागले होते. वर्क फ्रंटवर जान्हवी कपूर करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये तिची मैत्रिण सारा अली खानसोबत दिसणार आहे. या शोमध्ये दोन्ही अभिनेत्रींमधील केमिस्ट्री पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT