Aishwarya Rai Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ponniyin Selvan Trailer: ऐश्वर्या रायच्या पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, सिंहासनासाठी होणार युद्ध

ऐश्वर्या राय बच्चनचा ऐतिहासिक ड्रामा चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची ब्यूटी क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा(Aishwarya Rai) ऐतिहासिक ड्रामा चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन'(Ponniyin Selvan) सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. हा ट्रेलर तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात १०व्या शतकातील तामिळनाडूतील चोळसचा गौरवशाली इतिहास दाखवण्यात आला आहे. ऐश्वर्या राय बच्चन 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटामध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारत आहे. राणी नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे. ऐश्वर्या राय बच्चनचा 'पोन्नियिन सेल्वन' हा चित्रपट ३० सप्टेंबरला सिनेगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ऐश्वर्या राय या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्या राणी नंदिनी जी पझुवूरची राजकन्या आहे आणि सूड घेण्याच्या मोहिमेवर आहे. तसेच ऐतिहासिक नाटकात मंदाकिनी देवी अशा दोन भूमिका साकारणार आहे. त्याशिवाय शोभिता धुलिपाला देखील या चित्रपटाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. या चित्रपटात ती वनाथी या विनोदी आणि नम्र राणीची भूमिका साकारणार आहे.

चेन्नईमध्ये एका भव्य कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. कार्यक्रमाला चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नमसह चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते विक्रम आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायही उपस्थित होते. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासनही या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रेलरपूर्वी चित्रपटाचा टीझर आणि गाणी नुकतीच रिलीज करण्यात आली असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

'पोन्नियिन सेल्वन पार्ट १' च्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी ऐश्वर्या खूप आनंदी होती. तिचा आनंद व्यक्त करताना ऐश्वर्या म्हणाली की, 'ट्रेलर लॉन्चच्या वेळी मला खूप आनंद झाला. हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्वाचा चित्रपट आहे. मणिरत्नम यांच्यासोबत पुन्हा काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. संपूर्ण टीम खूप प्रतिभावान आहे. ए आर रहमानच्या संगीताने संध्याकाळ आणखीनच प्रेक्षणीय बनवली आहे. मी भाग्यवान आहे की मला माझ्या करिअरच्या सुरुवातीला मणिरत्नमसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याचे सौभाग्य मिळाले'.

'पोन्नियिन सेल्वन' हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटाचा पहिला भाग आहे. जो ५०० कोटींच्या बिग बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन व्यतिरिक्त चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, लाल आणि शोभिता धुलिपाला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा साउंडट्रॅक ए आर रहमानने संगीतबद्ध केला आहे. तर रवि वर्मनने त्याचे चित्रीकरण केले आहे. लायका प्रॉडक्शन द्वारे निर्मित, हा चित्रपट आयमॅक्स थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला तमिळ चित्रपट असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT