Filmfare Awards 2022 : फिल्मफेअर पुरस्कार जाहीर; 'या' तारखेला होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर

लवकरच प्रेक्षकांसाठी घर बसल्या अवॉर्ड कार्यक्रमाचे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर ही होणार आहे.
Filmfare Awards
Filmfare Awards saam tv

Filmfare Awards News : चित्रपटसृष्टीतील 'फिल्मफेअर अवॉर्ड्स' हा मानाचा पुरस्कार समजला जातो. मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी 'फिल्मफेअर अवॉर्ड्स' पुरस्कार विजेत्या कलाकारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या सुत्रसंचलानाची धुरा रणवीर सिंग आणि अर्जुन कपुर यांच्याकडे होती. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत असलेल्या 'शेरशाह' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तर दिग्दर्शक विष्णुवर्धन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी पुरस्कार मिळाला आहे. लवकरच प्रेक्षकांसाठी घर बसल्या अवॉर्ड कार्यक्रमाचे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर ही होणार आहे.

Filmfare Awards
Amitabh Bachchan: बिग बींनी केबीसीच्या सेटवर डॉक्टरांनी दिलेले सर्व नियम तोडले...

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाची भव्य दिव्यता, रंगारंग शानदार संध्याकाळ, कलाकारांची रेडकार्पेटवरील रेलचेल आणि इत्यादी या सर्वांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. मुंबईत जियो वर्ल्ड कनवेन्शन सेंटर (Jio World Convention Center) मध्ये पार पडलेला कार्यक्रम ९ सप्टेंबरला कलर्स वाहिनीवर ठीक सायंकाळी ९वा. प्रसारण केले जाणार आहे. या कार्यक्रमात कलाकारांनी सादर केलेला डान्स परफॉरमन्स कार्यक्रमाची शोभा वाढवणारा नक्की ठरेल. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

२०२२चे पुरस्काराचे मानकरी

'83' चित्रपटासाठी रणवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेता मुख्य भूमिका (पुरूष) तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मुख्य भूमिकेसाठी (महिला) 'मिमी' चित्रपटासाठी क्रिती सेननला पुरस्कार मिळाला आहे. 'सरदार उधम' चित्रपटासाठी विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) पुरस्कार प्राप्त झाला असून अभिनेत्री विद्या बालनला 'शेरनी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)साठी पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक सुभाष घई यांना लाईफटाईम अचिव्हमेंट (Lifetime Achivement) पुरस्काराने गौरविले आहे.

Filmfare Awards
Raju Shrivastava Health Updates: राजू श्रीवास्तव अद्याप शुद्धीत नाही; पत्नीने दिली मोठी अपडेट म्हणाली...

सर्वोत्कृष्ट गीत - कौसर मुनीर (लेहरा दो - 83)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - बी प्राक (मन भराया शेरशाह)

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री - शर्वरी वाघ (बंटी और बबली)

सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक - सीमा पाहवा (रामप्रसादचा तेरावा)

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता पुरुष - एहान भट्ट (99 गाणी)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com