Amitabh Bachchan: बिग बींनी केबीसीच्या सेटवर डॉक्टरांनी दिलेले सर्व नियम तोडले...

अमिताभ बच्चन यांची 'गुडबाय' चित्रपटामुळे (Movie) चांगलीच चर्चा रंगत आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSaam TV
Published On

मुंबई: सध्या बॉलिवूडचे शहंशाह म्हणून प्रचलित असलेले अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची 'गुडबाय' चित्रपटामुळे (Movie) चांगलीच चर्चा रंगत आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर आपले अनेक अनुभव शेअर करत असतात. तसेच त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून एक अनुभव शेअर केला असून पण तो अनुभव मनाला चटका लावणारा आहे.

शेअर केलेला अनुभव सध्या होस्ट करत असणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती' शोच्या संबंधितच आहे. सेटवर एका खास व्यक्तीला अमिताभ बच्चन भेटले आणि त्यांच्याकडून ती हकिकत लिहून घेतली.

ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन बोलतात, "सेटवर एका मुलीसोबत ओळख झाली तिचं नाव अवनी होतं. ती अंध मुलगी होती. तसेच तिचं सहज वावरणं खूपच वेगळं होतं. तिला पाहताच अमिताभ यांना आपल्या आयुष्यात घडलेला काळ आठवला तो म्हणजे जेव्हा ते आपल्या हात पायांना हलवू शकत नव्हते. पण योग्य उपचारांमुळे लगेच बरे झाले आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

पाहा व्हिडीओ -

कोरोनाची लागण बिग बींना दुसऱ्यांदा झाली होती. त्यांनी ही माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनच दिली होती. परंतू डॉक्टरांनी बिग बींना लोकांमध्ये न वावरण्याचा सल्ला दिला आहे. केबीसीच्या मंचावरही ते जास्त लोकांच्या संपर्कात येत नाहीत. पण ते अवनीपासून स्वत:ला वेगळे ठेवू शकले नाही. परंतू त्यांनी तिच्यासाठी डॉक्टरांनी दिलेला नियम तोडल्याचे दिसून आले."

बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, 'मी तिचे हात माझ्या हातात घेतलं, तिला स्पर्श केला, म्हणजे तिला कळावं की मी तिच्या जवळ उभा आहे.' तेव्हा अमिताभ यांनी अवनीनं ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे पाहिलं याविषयी देखील सविस्तर सांगितलं आहे. ते म्हणाले की, 'तिला माझ्याविषयी, माझ्या सिनेमांविषयी सगळं माहित होते.

२०१९ ला माझ्या वाढदिवशी अवनीने मला पत्र लिहिलं होतं. तिनं KBC मध्ये आल्यावर मला विचारलं की मला तिचं पत्र मिळालं होतं का? ती मला म्हणाली की, ती मला सोशल मीडियावर (Social Media) फॉलो करते, मग मी पण तिला वचन दिलं की, मी देखील तिला फॉलो करेन. आज सकाळपासूनच मी इंस्टाग्राम आणि फेसबूक दोन्ही ठिकाणी, आणि ट्वीटरवर देखील फॉलो करायला सुरुवात केली.''

Amitabh Bachchan
रणबीर कपूर-आलिया भट्ट महाकालचे दर्शन न घेताच परतले; काय आहे त्यामागचं कारण?

यापुढे अमिताभ यांनी आपल्या आयु्ष्याविषयी देखील काही गोष्टी ब्लॉगमध्ये शेअर केल्या आहेत. ते म्हणतात, ''मला काही शारिरीक व्याधींशी खूप मोठी झुंज द्यावी लागली होती. असं अनेकदा माझ्यासोबत झाले आहे, जेव्हा-जेव्हा आजारामुळे माझे अवयव निकामी झालेत.

त्यांनी काम करणं बंद केलं होतं. याविषयी मी फार काही उगाचच सांगत बसणार नाही तुम्हाला. पण एवढंच सांगेन की त्या प्रत्येक कठीण प्रसंगात देवाच्या कृपेने, कुटुंबाच्या मदतीनं, मोठ्यांच्या आशीर्वादाने, डॉक्टरांच्या प्रयत्नांनी मी ठणठणीत बरा झालो. खुप अडचणीतून प्रवास केल्यावर सगळं पहिल्यासारखं म्हणता येणार नाही पण व्यवस्थित झालं आहे एवढं मात्र नक्की''.

लहान मुलांच्या आयुष्यावर बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, 'खूप लोकांच्या बाबतीत असं झालंय ज्यांनी आपलं शरीरानं सक्षम होणं गमावलं आणि पुन्हा ते त्यांना कधीच मिळालं नाही. त्यांच्याविषयी विचार केला की खरंच मन सुन्न होतं. खासकरुन अवनी आणि तिच्यासारख्याच दोन छोट्या मुलांना पाहिल्यावर आणखी मन दुःखावतं.

Amitabh Bachchan
रणबीर कपूर आणि नीतू कपूर गणेश आरतीत तल्लीन, व्हिडिओ झाला तूफान व्हायरल

मी माझ्या आयुष्यात गमावलं होतं जे पुन्हा मला मिळालं . पण या मुलांच्या बाबतीत तसं नाही झालं. हा पक्षपातीपणा म्हणावा का निसर्गाचा?'' अमिताभ आता कोरोनामुक्त झाले असून पुन्हा शूटिंगवर परलेयत. सध्या ते 'केबीसी १४' चं सूत्रसंचालन करत आहेत. लवकरच त्यांचा रश्मिका मंदानासोबतचा 'गूडबाय' भेटीस येतोय. सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com