Kantara soon release in Hindi on OTT Platform Netflix  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kantara In Hindi: 'कांतारा' चित्रपट बघायचा राहून गेलाय का? चित्रपट रसिकांसाठी आली नवी अपडेट

ऋषभचा शेट्टीचा एक व्हिडिओ नेटफ्लिक्सने त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

Pooja Dange

Kantara In Hindi OTT Release Date: बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केल्यानंतर कांतारा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. हा सुपरहिट चित्रपट २४ नोव्हेंबरला प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. कांतारा चित्रपट कन्नड, तामिळ, तेलगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट अजूनही हिंदीत प्रसारित झालेला नाही. या चित्रपट हिंदी व्हर्जन ओटीटीवर कधी येणार? असा प्रश्न हिंदी प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहे. आता या प्रश्नाचे उत्तर ऋषभ शेट्टीने याने दिले आहे.

कांतारा प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. त्याचे हिंदी व्हर्जन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे आणि असा करार नेटफ्लिक्सबरोबर झाला असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनी दिली आहे. ही माहिती अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. लवकरच कांतारा नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. (OTT)

कांताराचे दिग्दर्शक आणि मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता ऋषभ शेट्टीने एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ऋषभचा शेट्टीचा एक मजेदार व्हिडिओ नेटफ्लिक्सने त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऋषभ शेट्टीच्या फोनवर एकामागून एक अनेक लोकांचे मेसेज येत असल्याचे दाखवण्यात आले. प्रत्येक मेसेजमध्ये ओटीटीवर कांतारा हिंदीमध्ये कधी येणार असे लिहिले आहे.

या मेसेजेमुळे ऋषभ शेट्टी थोडा चिडतो असे दाखविण्यात आले आहे. त्यानंतर कुरिअर घेऊन एक व्यक्ती त्याच्या दारात उभी राहते आणि ऋषभला कांताराच्या हिंदी प्रश्न विचारते. व्हिडिओच्या शेवटी ऋषभ शेट्टी ओटीटीवर कांतारा हिंदी भाषेत कधी प्रदर्शित होणार हे जाहीर करतो. (Movie)

ज्या प्रेक्षकांना कांतारा हिंदीमध्ये बघायचा आहे त्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कांतारा ९ डिसेंबर रोजी हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकून, जालना हादरलं

Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT