श्रेयस सावंत
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) अजय देवगण (Ajay Devgan) यांची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत सर्व चाहत्यांना उत्सुकता होती. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला हा बिग बजेट सिनेमा सिनेरसिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या सिनेमातील दाखवण्यात आलेली डायलॉग या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. याआधी ६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे गंगूबाई काठियावाडी या चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. (Gangubai Kathiawadi Release Date Announced)
आलिया भट्ट या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. तर अजय देवगण गंगूबाईला बहीण मानणाऱ्या गँगस्टर (Gangster) करीम लालाच्या भूमिकेत दिसणार आहे. ६० च्या दशकातील मुंबईतील महिला माफिया गंगूबाईच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. गंगूबाई मुंबईतल्या कामाठीपुरात एक कोठा चालवत होती यावर हा गोष्ट आधारित आहे. (Alia Bhatt Latest News)
काय सिनेमाची गोष्ट
मुंबईतील महिला माफिया गंगूबाईच्या ६० च्या दशकातील जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. गंगूबाई मुंबईतल्या कामाठीपुरात कोठा चालवत होती आणि यावर हा चित्रपट आधारित आहे. हुसेन झैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातील कथेवर आधारित या सिनेमाची पटकथा लिहिण्यात आली आहे. या सिनेमातील आलियाची भूमिका चाहत्यांना आवडणारी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.