Teaser of the second song Deva Deva from the film Brahmastra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Brahmastra: केसरियानंतर आता 'देवा देवा'; आलिया-रणबीरचा रोमान्स, टीझर आला...

निर्मात्यांनी ब्रह्मास्त्र चित्रपटातील 'देवा देवा' या दुसऱ्या गाण्याचा टीझर रीलीज केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॅालिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. आलिया-रणबीर जोडीला एकत्र बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अलीकडेच या चित्रपटातील केसरिया गाणं रीलीज झालं होतं. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

लवकरच चित्रपटातील दुसरं गाणं रीलीज होणार आहे. केसरियामधल्या रणबीर आणि अलियाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीमुळे दुसऱ्या गाण्यात नेमके काय असेल, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यात आता निर्मात्यांनी चित्रपटातील 'देवा देवा' या दुसऱ्या गाण्याचा टीझर रीलीज केला आहे. यातही आलिया-रणबीरचा रोमान्स दाखवण्यात आला आहे.

बहुप्रतीक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'देवा देवा' गाण्याचा टीझर रीलीज झाला आहे. गाण्याच्या टीझरमध्ये रणबीर आलिया भट्टला दिव्यशक्तीबद्दल समजून सांगताना दिसतो आहे. टीझरमध्ये रणबीर कपूरसोबत अमिताभ बच्चनही दिसत आहेत. प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने हे गाणे गायलं आहे. जे रीलीज होताच प्रेक्षकांच्या पंसतीस उतरले आहे. गाण्याला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. येत्या ८ ऑगस्टला हे गाणं प्रदर्शित होईल.

याआधी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात अरिजीत सिंगने गायलेले 'केसरिया' हे गाणे प्रेक्षकांना प्रंचड आवडले होते. गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. गाण्यात वाराणसीच्या रस्त्यावरील रणबीर आणि आलियाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीनं चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं.

ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी आहेत. ब्रह्मास्त्र हिदींसोबतच कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपट हा तीन भागांत आहे. चित्रपटाचा पहिला भाग पुढील महिन्यात ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या उर्वरित दोन भागांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागर्जुन अक्किनेनी, मौनी रॉय यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

रणबीर कपूरने नुकतेच शमशेरा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. मात्र, बॉक्स ऑफिसवर चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्याला आता या चित्रपटाकडून खूप आशा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT