Bhuvan Bam - Kapil Sharma SaamTV
मनोरंजन बातम्या

The Kapil Sharma Show मध्ये भुवन बामने सांगितली आडनावाची ‘Untold Story’, शेअर केला शाळेतील रंजक किस्सा

Bhuvan Bam In Kapil Sharma Show: कपिल शर्मा शोचा नवा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनबाबत कपिलनं सोशल मीडियावर माहिती दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

The Kapil Sharma Show: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो द कपिल शर्मा शोचा आगामी सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी कपिल शर्मा या शोमध्ये प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. कपिल शर्मा शोच्या नवीन सीझनमध्ये कोण असणार आहे? प्रेक्षकांमध्ये याबाबतची उत्कंठा वाढली आहे. द कपिल शर्मा या शोच्या नव्या पर्वामध्ये भुवन बाम दिसणार असल्याच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे.

कपिल शर्मा शोचा नवा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनबाबत कपिलनं सोशल मीडियावर माहिती दिली. सोशल मीडियावर शोच्या आगामी सीझनचा प्रोमो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भुवन बामसह एमसी स्टॅन, हर्ष गुजराल आणि डॉली सिंह दिसत आहेत. ज्यामध्ये कपिल शर्मा भुवनला त्याच्या यूट्यूब चॅनलबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. याचवेळी कपिलने भुवनला त्यांच्या अडनावबद्दल विचारले असता, भुवनने त्यावर मजेदार किस्सा सांगितली आहे.

नुकतचं सोनीच्या सोशल मीडिया पेजवर कपिल शर्मा शोच्या आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये सोशल मीडिया सेलिब्रिटी युट्यूबर भुवन बाम, हर्ष गुजराल, डॉली सिंग आणि एमसी स्टॅन एकत्र दिसत आहेत. दरम्यान कपिल शर्मा भुवनला त्याच्या नावाबद्दल विचारतो आहे, कपिलने भुवनला इशारा करत, "मला एक सांग की, भुवन या तुझ्या नावाच्या आधी 'बाम' हे तुझे अडनाव आहे..., तू सुरुवातीला केलेला युट्यूब कंटेंट पाहून मलाही असचं वाटलं होतं की. खरचं तुला बामची गरज आहे का?

यावरने भुवन म्हणतो, मी माझे संपूर्ण आयुष्य याच माझ्या नावाच्या विनोदाने जगलो आहे. लहानपणी शाळेतही मला माझे मित्र झंडू बाम म्हणायचे. यावरती माझ्या मोठ्या भावाने मला सांगितले की ज्यावेळेस तुला कोणी झंडू बाम बोलेल तेव्हा तू त्यांना लावू का ?? असे म्हण. तुला कोणीच काही बोलणार नाही...

माहीतीनुसार, भुवन बामने युट्यूबच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली आहे. त्याने त्याच्या करिअरची सुरूवात देखील अशीच केली होती. कॉमेडी व्हिडिओ शेअर करत भुवन प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. बीबी के वाइन या त्याच्या व्हिडिओला मिळालेली प्रसिध्दी पाहून त्याने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्याने त्याचा एक म्युझिक व्हिडिओही सादर केला. भुवनचे तेरी मेरी कहानी हे गाणं प्रेक्षकांच्या पंसतीस आले. यानंतर भुवनने संग हूँ तेरे, सफर यासांरखी अनेक गाणी सादर केली

Edited By: Manasvi Choudhary

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT