IMDb (www.imdb.com), जो चित्रपट, टीव्ही शो आणि सेलिब्रिटींबाबतची जगातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह माहितीचा स्रोत आहे, त्यांनी २०२४ मध्ये IMDb वापरकर्त्यांमध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेल्या १० भारतीय वेब सिरीजची घोषणा केली. IMDb च्या या वर्षअखेरच्या यादीचा आधार IMDb वरील दर महिन्याला भेट देणाऱ्या २५० दशलक्षांहून अधिक वापरकर्त्यांच्या वास्तविक पृष्ठदृश्यांवर आधारित आहे, ज्याद्वारे वापरकर्ते काय पाहावे याचा निर्णय घेतात.
जिथे संजय लीला भन्साळींच्या हीरामंडी: द डायमंड बाजार ने या यादीत पहिला क्रमांक पटकावला, तिथे द ग्रेट इंडियन कपिल शो IMDb च्या वार्षिक यादीत स्थान मिळवणारा पहिला नॉन-फिक्शन शो ठरला. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक असलेला हा शो डिजिटल पदार्पणानंतर जागतिक पातळीवर पोहोचला आणि या यादीत १० वे स्थान मिळवले.
आपली भावना व्यक्त करताना कपिल शर्मा म्हणाले, "मी मनापासून अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरलेलो आहे की द ग्रेट इंडियन कपिल शो IMDb च्या टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय भारतीय वेब सिरीजमध्ये समाविष्ट झाला आहे. ही उपलब्धी आमच्या अद्भुत टीमची, आमच्या शानदार पाहुण्यांची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रेक्षकांची आहे, ज्यांनी आम्हाला वर्षानुवर्षे भरभरून प्रेम दिल आहे. या यादीत एकमेव नॉन-फिक्शन शो असल्याने ते अधिक खास बनते, कारण ते हास्याची ती शक्ती अधोरेखित करते जी लोकांना एकत्र आणते. ही यात्रा अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार!"
IMDb ची २०२४ मधील सर्वात लोकप्रिय भारतीय वेब सिरीज यादी:
1. हीरामंडी: द डायमंड बाज़ार
2. मिर्ज़ापुर
3. पंचायत
4. ग्यारह ग्यारह
5. सिटाडेल: हनी बनी
6. मामला लीगल है
7. ताज़ा खबर
8. मर्डर इन माहिम
9. शेखर होम
10. द ग्रेट इंडियन कपिल शो
ही यादी १ जानेवारी ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान भारतात प्रदर्शित झालेल्या आणि IMDb वापरकर्त्यांकडून ५ किंवा त्याहून अधिक रेटिंग मिळालेल्या सर्व वेब सिरीजवर आधारित आहे. या शीर्षकांनी IMDb च्या २५० दशलक्षांहून अधिक मासिक वापरकर्त्यांमध्ये सातत्याने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.