
मुंबई : मुंबईतील कर्जत-कल्याण राज्यमार्गावर आयशर टेम्पो आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघातात झाला आहे. यावेळी मोटरसायकलवरून प्रवास करणारे दाम्पत्य जबर जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. एकनाथ बबन शेंडे असं मयत व्यक्तीचं नाव समोर आलं असून पत्नी जयश्री एकनाथ शेंडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेरळजवळील बेकरे असलपाडा गावातील राहणारे हे दाम्पत्य मोटरसायकलवरून नेरळच्या दिशेने येत असताना मागून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोच्या चाकाखाली येऊन हा अपघात घडला. घटनास्थळी नेरळ पोलीस हजर झाले असून टेम्पोचालक वाहन सोडून फरार झाला आहे. पत्नीच्या डोळ्यासमोरच आपल्या पतीचा मृत्यू झाल्यानं पत्नीनं भरपावसात आणि भररस्त्यात आक्रोश केला.
५२ वर्षीय एकनाथ बबन शेंडे आणि पत्नी जयश्री एकनाथ शेंडे हे दाम्पत्य बाजारात काही वस्तू खरेदीसाठी म्हणून आपल्या गावातून नेरळ येथे मोटरसायकलवर निघाले होते. एकीकडे पाऊस कोसळत असताना कर्जत दिशेकडून कल्याण दिशेने भरधाव निघालेल्या आयशर टेम्पो हा राज्यमार्गावरील टोकरे आंबिवली परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आसशर आणि मोटरसायकलमध्ये हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटरसायकल थेट टेम्पोच्या पुढच्या चाकाखाली जाऊन अडकली. अपघात झाल्यावर मोटरसायकलवरील दांम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते. पतीच्या डोक्यातून तर महिलेच्या नाकातून आणि डोक्यातून रक्तस्त्राव होऊन रस्ता रक्ताने माखलेला होता.
दरम्यान, नागरिकांच्या भीतीनेच टेम्पोचालक आपलं वाहन सोडून घटनास्थळाहून फरार झाला. जखमींना स्थानिकांनी भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता यातील एकनाथ बबन शेंडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. शिवाय पत्नी जयश्री एकनाथ शेंडे ह्या जबर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून फरार टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.