Janhvi Kapoor's upcoming movie
Janhvi Kapoor's upcoming movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

GoodLuck Jerry First Look : हातात बंदूक घेत जान्हवी कपूरचा अॅडव्हेंचर; 'गुडलक जेरी'चा फर्स्ट पोस्टर रिलीज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री (actress) आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिचा लवकरच 'गुड लक जेरी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जान्हवी कपूरने तिच्या 'गुड लक जेरी'या चित्रपटाची (movie) घोषणा केल्यापासून चाहते चित्रपटाच्या फर्स्ट लूकची आणि प्रदर्शित होण्याच्या तारखेची वाट पाहत आहेत. जान्हवीने या चित्रपटातील तिचा फर्स्ट लुक आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली असून आज तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. 'गुंजन सक्सेना'नंतर ही अभिनेत्री 'गुड लक जेरी'मध्ये दिसणार आहे आणि विशेष म्हणजे हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे दोन वेगवेगळे पोस्टर प्रदर्शित केले आहेत, ज्यामध्ये जान्हवीचा दमदार अवतार दिसत आहे. जान्हवी कपूरचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट २९ जुलै २०२२ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

जान्हवीने या चित्रपटाचे दोन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये जान्हवी घाबरून हातात बंदूक धरलेली दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये जान्हवी एका बॉक्सच्या मागे लपलेली आहे. बॉक्सच्या वर एका बाजूला लंच बॉक्समध्ये मॅगी ठेवली जाते आणि दुसऱ्या बाजूला मोमोज. दोन्ही पोस्टर खूपच कुतूहल निर्माण करणारे आहेत.

पोस्टर शेअर करताना जान्हवी कपूरने लिहिले की, 'मी निघाली आहे, नवीन साहसासाठी मला शुभेच्छा देणार नाही का? जसं की गुड लक २९ जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल'. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ याने केले आहे, तर चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय, सुबास्करन आणि महावीर जैन यांनी केली आहे.

कपाळावर टिकली लावलेल्या सध्या मुलीच्या हातात बंदूक बघून चाहते या चित्रपटाची गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्साही आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पंजाब आणि चंडीगढमध्ये झाले आहे. त्याचबरोबर जान्हवी कपूरचा राजकुमार राव सोबतचा तिचा आगामी चित्रपट 'मिस्टर एंड मिसेज माही' लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Side Effect : दूधासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका; अन्यथा आयुष्यभर पस्तावा होईल

Sleeping pills: तुम्ही देखिल झोपेच्या गोळ्या खाताय? होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

SCROLL FOR NEXT