ए. आर. रहमान यांना आठवलं बालपण, हॉस्पिटलमध्ये घालवलेल्या 'त्या' क्षणांनी झाले भावूक

ऑस्कर विजेता सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले, त्यांना वडिलांचे आजारपण आणि आयुष्यातील खडतर दिवस आठवले. ते म्हणाले की, 'माझे बालपण सामान्य नव्हते.
A.R. Rahman Instagram
A.R. Rahman Instagram Saam Tv
Published On

मुंबई : ऑस्कर विजेता सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान (A.R. Rahman)यांना आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही. ए. आर. रहमान यांनी आपल्या संगीताच्या जोरावर साऊथ सिनेसृष्टी, बॉलिवूड (bollywood) आणि हॉलिवूडमध्ये ठसा उमटवला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? त्यांच बालपण खूप अडचणींमधून गेलं, ज्या वयात मुलगा वडिलांचं बोट धरून समाजाबद्दल जाणून घेऊ लागतो, त्याच वयात ए. आर. रहमान यांनी आपल्या वडिलांना गमावले. ए. आर. रहमान अवघ्या ९ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचे वडील आर. के. शेखर हे लोकप्रिय संगीतकार आणि संगीत संवाहक होते, त्यांनी दक्षिणेतील काही आघाडीच्या संगीतकारांसोबत काम केले होते. ए. आर. रहमान यांच्या लहान वयातच वडील आर. के. शेखर यांची साथ सुटली, पण संगीताचा वारसा त्यांनी मुलाकडे सोपवला. काही दिवसांपूर्वी, ए. आर. रहमान यांनी त्यांच्या बालपणीच्या त्या कठीण दिवसांची आठवण काढली होती, जी विसरणे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे.

A.R. Rahman Instagram
प्रियांकाने दाखवली मुलीची पहिली झलक; आईच्या वाढदिवसाला केला खास फोटो शेअर

वडिलांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेले बालपण...

ए. आर. रहमान यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांना बालपणीचे दिवस आठवले, त्यांना वडिलांचे आजारपण आणि आयुष्यातील खडतर दिवस आठवले. ते म्हणाले की, 'माझे बालपण सामान्य नव्हते. मी प्रामुख्याने माझ्या वडिलांच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये राहायचो, मला तिथे खूप एकटे वाटायचे. मी वयाच्या ११-१२ वर्षांपासूनच काम करायला सुरुवात केली.

A.R. Rahman Instagram
काश्मिरी पंडितांवर वादग्रस्त वक्तव्य करून सई पल्लवी वादाच्या भोवऱ्यात; गुन्हा दाखल

लहानपणी कधी खेळायला मिळालेच नाही...

वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, 'लहानपणी मला कधी बाहेर जाण्याची किंवा खेळण्याची संधी मिळालीच नाही. पण हो, माझ्याकडे जो काही वेळ होता, तो मी फक्त संगीतात घालवला, संगीत हे माझ्यासाठी एक वरदान आहे'.

ए.आर. रहनामच्या वडिलांनी १९७६ मध्ये घेतला जगाचा निरोप...

वडिलांच्या आजारपणाच्या गोष्टींची आठवण काढत नसल्याचे त्यांनी सांगितले पण नंतर कधी-कधी या गोष्टी आठवतात. जुन्या गोष्टींची आठवण करून देताना ए.आर. रहमानयांनी सांगितले की, १९७६ मध्ये त्यांचा वडिलांचा मृत्यू होईपर्यंत वडील जवळपास ४ वर्षे आजारी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com