ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दादरचे मार्केट हे मुंबईतील प्रसिध्द मार्केट आहे. लग्नाच्या खरेदीसाठी दादर हे मार्केट तुम्ही निवडू शकता. रेशमी साड्या, पैठणी, नऊवारी, लेहेंगा आणि ब्लाउज मटेरियल मोठ्या प्रमाणात येथे मिळते.
झवेरी बाजार हा दागिन्यांचा खजिना म्हणून ओळखला जातो. हिरे सोने, चांदी,अशा सर्व प्रकारचे लग्नासाठी लागणारे दागिने कमी दरात स्वस्तात मस्त मिळतात.
लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्याच वस्तू येथे सहज उपलब्ध आहेत. लग्नाच्या सजावटीच्या वस्तू, भेटवस्तू, बांगड्या, हेअर अॅक्सेसरीज आणि मेहंदी साहित्य इथे स्वस्तात मिळते.
मंगळदास मार्केट हे लग्नासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे साड्यांची खरेदी तुम्ही होलसेल दरात करु शकता. नवरीसाठी तसेच महिलांसाठी अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत.
रिसेप्शन आउटफिटसाठी तुम्ही लिंकिंग रोडला जावून खरेदी करु शकता. इंडो-वेस्टर्न कपडे, ब्रायडल सॅंडल्स आणि पार्टिवेअर कपडे येथे उत्तम मिळतील.
संपूर्ण लग्न शॉपिंग तुम्ही या एकाच ठिकाणी करु शकता. भुलेश्वर मार्केट हे बजेट फ्रेंडली शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. साड्या, दागिने, पूजेचे साहित्य, नवरीचे दागिने आणि लग्नाचे साहित्य एकाच ठिकाणी मिळेल.
मेकअप आणि अॅक्सेसरीजसाठी कुलाबा कॉजवे मार्केट प्रसिद्ध आहे. लग्नासाठी लागणारे मेकअप प्रॉडक्ट्स, हेअर स्टाईल अॅक्सेसरीज, बांगड्या आणि ईअर रींग्स कुलाबा कॉजवेला सहज मिळतात.