Shreya Maskar
खर्डा किल्ला हा अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेला एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे.
१७९५ मध्ये खर्ड्याच्या किल्ल्याजवळ मराठा साम्राज्य आणि हैदराबादचा निजाम यांच्यात 'खर्ड्याची लढाई' झाली होती, ज्यात मराठ्यांनी निर्णायक विजय मिळवला होता आणि निजामाचा पराभव झाला होता.
खर्डा किल्ल्यावर तटबंदी, प्रवेशद्वार, विहीर आणि मशिदीचे अवशेष आढळतात, जे या किल्ल्याच्या ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्त्वाचे पुरावे आहेत. किल्ल्यावर जलव्यवस्थापनाची साधने दिसतात.
खर्डा किल्ला सरदार निंबाळकर यांनी १७४५ मध्ये बांधला होता, असे मानले जाते. हा एक भुईकोट किल्ला आहे.
खर्डा किल्ला आणि आसपासच्या परिसरात खर्ड्याच्या ऐतिहासिक लढाईत शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ वीरगळ (शहीद स्मारके) आहेत, जे त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण करून देतात.
खर्डा किल्ल्याजवळ रण टेकडी, निंबाळकरांची गढी व वाडा, ओंकारेश्वर मंदिर, कुंभेफळ पक्षी उद्यान, नवीन चंदनपुरी घाट, अहमदनगर किल्ला आणि चांदबिबी महल अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
खर्डा किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. निसर्गाचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो. त्यामुळे हिवाळ्यात येथे नक्की जा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.