Bollywood Upcoming Movie
Bollywood Upcoming Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Upcoming Movie: अटल बिहारींच्या जीवनावर चित्रपट, 'हा' धडाडीचा कलाकार साकारणार पंतप्रधानांची भूमिका

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीने (Pankaj Tripathi)दमदार अभिनयाने हिंदी सिनेमासृष्टीत स्थान कायम ठेवले आहे. पंकजने मनोरंजन विश्वातील त्याच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा पंकज त्रिपाठी धमाकेदार चित्रपट (Movie)घेऊन येत आहे. देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजयेपी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. ज्याचे नाव 'मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल' असे आहे.

'मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल' हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न होते. हे स्वप्न वास्तवात आणण्याचा मानस दिग्दर्शक रवी जाधव यांनी घेतला आहे.'मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल' हा सिनेमा पेंग्विन रँडम हाऊस इंडियाच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशियन अँड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात वाजपेयींचे वैयक्तिक आणि राजकीय जीवन दाखवण्यात येणार आहे

अटलजी हे भारतीय राजकारणातील अशा व्यक्तिमत्वापैंकी एक होते, ज्यांनी देशाच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकला. इतकंच नाही, तर त्यांची बुद्धी आणि वकृत्व शैली त्यांच्या मित्रांनाच नव्हे, तर त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनाही पटणारी होती.

महत्वाचे म्हणजे बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठी हा भारताच्या माजी पंतप्रधानांच्या बायोपिकमध्ये वाजपेयींची भूमिका साकारणार आहे. पंकजला वाजपेयींच्या व्यक्तिरेखेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. अलीकडेच निर्मात्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पंकज त्रिपाठीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर पंकजने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. गँग्स ऑफ वासेपूर, क्रिमिनल जस्टिस, मिर्झापूर यांसारख्या वेबसिरीजशिवाय मसान, कागज, मिमी यांसारख्या अनेक चित्रपटांत पंकजने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT