Main Rahoon Ya Na Rahoon Yeh Desh Rehna Chahiye -Atal  Saam Tv
मनोरंजन बातम्या

अटलबिहारी वाजपेयींच्या जीवनावर येतोय चित्रपट, कधी रीलीज होणार?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर हा चित्रपट बनत असून, या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. ज्याची घोषणा आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडमध्ये आणखी एका बायोपिकवर काम सुरू झाले आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर हा चित्रपट तयार केला जात असून, या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. ज्याची घोषणा आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर बनत असलेल्या या चित्रपटाचे , 'मैं रहूं या ना रहूं देश रहना चाहिए- अटल' असे नाव आहे. या मोशन पोस्टरसह अटलबिहारी वाजपेयींचा आवाज ऐकायला मिळत आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकचे मोशन पोस्टर हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. संदीप सिंग आणि विनोद भानुशाली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मोशन पोस्टरमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचे काही वाक्य ऐकू येत आहेत. ज्यात ते म्हणत आहेत की, 'सत्तेचा खेळ सुरूच राहणार... सरकारे येतील, जातील... पक्ष बनतील आणि बिघडतील'. पण, हा देश राहिला पाहिजे, या देशातील लोकशाही अमर राहिली पाहिजे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच २५ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'द अनटोल्ड वाजपेयी' या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरु होणार आणि वर्षाच्या शेवटी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटातील स्टारकास्ट आणि चित्रपटाशी निगडीत अन्य गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत.

चित्रपटाचे समीक्षक तरण आदर्शने ट्वीटर अकाउंटवरून या चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर केला आहे. 'अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील चित्रपटाची घोषणा: विनोद भानुशाली - संदीप सिंह निर्मिती करणार... या चित्रपटाचे नाव 'मैं रहूं या ना रहूं देश रहना चाहिए- अटल' असे त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT