मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान तसेच अभिनेता अनिल कपूर आणि फरदीन खान यांसारख्या सुपरस्टार असलेल्या 'नो एन्ट्री' चा सिक्वेल असलेल्या 'नो एंट्री में एन्ट्री' या चित्रपटाची चाहते बऱ्याच वर्षांपासून वाट पाहत आहेत. आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माहितीनुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून या चित्रपटात एक, दोन किंवा तीन नव्हे तर तब्बल १० अभिनेत्री असतील. या चित्रपटाचे सलमान लवकरच चित्रीकरण सुरु करणार आहे. त्याचबरोबर अनिल कपूरने सलमान खानसोबत या चित्रपटात काम करणार असल्याची माहिती दिली आहे.
अनिल कपूर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसले होते. २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अनिल कपूरने चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे. अनिल कपूर 'जुग जुग जिओ' नंतर लवकरच 'नो एन्ट्री २' च्या सिक्वेलवर काम सुरू करणार आहे.
एका वृत्तपात्राशी बोलताना अनिल कपूरला जेव्हा 'नो एन्ट्री २' संदर्भात प्रश्न विचारला तेव्हा अनिल कपूर म्हणाला की, 'प्रेक्षक फार आतुरतेने 'नो एन्ट्री २' ची वाट पाहत आहेत. मी या चित्रपटाचा एक भाग होणार म्हणून खूप खुश आहे. अनीस बज़्मी आणि सलमान खान लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे टाइमलाइन ठरवणार आहेत'. या यशस्वी कॉमेडी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल बोलताना अनिल कपूर पुढे म्हणाला की, 'चित्रपटात पुढे कोण असेल कोण नाही हे दिग्दर्शकांनी ठरवायचे असते. पण एक अभिनेता म्हणून या चित्रपटासाठी मी नेहमीच असेन.
माहितीनुसार, या चित्रपटात एकूण १० अभिनेत्री काम करणार आहेत. सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर हे १० अभिनेत्रींमुळे चित्रपटात तिहेरी भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. म्हणजेच प्रत्येक पात्रासोबत एक अभिनेत्री असेल. म्हणजेच सलमान, फरदीन, अनिल हे तीन नव्हे तर ९ अभिनेत्रींसोबत काम करणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडची अभिनेत्री नसून साउथची अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनीस बज्मी आणि सलमान खान या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत खूप सीरियस आहेत. सिक्वेलचे काम सुरू झाले आहे. जर सर्व काम वेळेवर झाले तर या वर्षाच्या शेवटपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.