Salman Khan Complaint And HC Quashes Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Case: सलमान खानला मोठा दिलासा; प्राणघातक हल्ला प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai High Court: मुंबई उच्च न्यायालयाने सलमानविरुद्ध दाखल केलेला एफआयआर फेटाळण्याचे आदेश दिले.

Pooja Dange

Salman Khan Complaint And HC Quashes: बॉलिवूडच भाईजान सलमान खानला 2019 च्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अभिनेत्याला अंधेरी न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली असून त्याचे समन्सही रद्द करण्यात आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने सलमानविरुद्ध दाखल केलेला एफआयआर फेटाळण्याचे आदेश दिले. 2019 मध्ये पत्रकार अशोक पांडे यांनी अभिनेत्यावर मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती.

2019 मधील एका घटनेदरम्यान अभिनेत्याने चित्रीकरणावर आक्षेप घेतल्यानंतर अशोक पांडेने सलमान खानवर कथितपणे त्याच्याशी गैरवर्तन केल्याचा आणि त्याचा फोन हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे.

२०१९ सालचे असून मुंबईच्या अंधेरी परिसरात सायकल चालवत असताना एका कथित पत्रकाराने सलमान खानचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर सलमानच्या अंगरक्षकाने त्याला हटकलं तेव्हा त्या पत्रकाराने त्यांच्याशी हु्ज्जत घालायला सुरूवात केली. त्यावेळी सलमान आणि त्याच्या अंगरक्षकांनी आपल्याला शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करत आपला फोन हिसकावून घेतल्याची तक्रार या पत्रकाराने केली .

या प्रकरणात अशोक पांडे या पत्रकाराने अंधेरीच्या डीएन नगर पोलिसस्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहचलं. अंधेरी कोर्टाने समन्स जारी करत सलमानला कोर्टात उपस्थित राहण्यासाठी बोलवलं. यानंतर सलमान खानने मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या या दोन्ही याचिकांवर स्वतंत्र्य सुनावणी झाली आणि या दोन्ही याचिका स्विकारत हायकोर्टाने हे सगळं प्रकरण रद्द केलं आहे.

त्यामुळे अंधेरी कोर्टातील याचिका आणि सलमानला बजावण्यात आलेलं समन्स रद्द करण्यात आलं आहे. यामुळे सलमान खान आणि त्याच्या सुरक्षारक्षकाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सलमान खानला बिश्नोई टोळीने ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हिंदीत लिहिलेला ई-मेल पाठवणाऱ्याने म्हटले आहे की, "गँगस्टर गोल्डी ब्रारहे प्रकरण बंद करण्यासाठी सलमान खानशी समोरासमोर बोलू इच्छित होते", ते पुढे म्हणाला, "पुढच्या तुम्हाला धक्का बसणार नाही तर पाहायला मिळणार", असे पोलिसांनी सांगितले होते.

"प्रकरणाच्या तपशीलवार तांत्रिक तपासानंतर, पोलिसांना आरोपी व्यक्तीच्या ठावठिकाणाबद्दल माहिती मिळाली, त्यानंतर एक पथक राजस्थानला पाठवण्यात आले आणि त्या व्यक्तीला अटक करण्यात आली," असे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गुंडांविरुद्ध प्रथम एफआयआर नोंदवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT