Drishyam 2 and Box Office: बॉलिवूड चित्रपटांसाठी हे वर्ष खूपच कठीण होते. बॉलिवूडमधील कलाकारांना देखील बॉक्स ऑफिस जादू करता आली नाही. वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटनांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच चित्रपट यशस्वी झाले. या यादीत अजय देवगनच्या 'दृश्यम २' देखील समावेश आहे.
अजय देवगनचा 'दृश्यम २' बॉलिवूडमधील यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. 'केजीएफ २' 'आरआरआर' या चित्रपटांना मागे टाकत दृश्यम २ इतिहास निर्माण करत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर ६व्या आठव्यातही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. (Bollywood)
'दृश्यम २' चित्रपटाला सहाव्या आठवड्यातही प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये आणण्यास यशस्वी ठरला आहे. कोविडनंतर हा पहिला चित्रपट आहे ज्याला बॉक्स ऑफिस सहा आठवडे टिकला आहे. पुष्पा नंतर 'दृश्यम २'ला ही कमाल करता आली आहे.
बॉक्स इंडियाच्या रिपोर्टनुसार 'दृश्यम २' सहाव्या आठवड्यात जवळपास ३. २५ कोटींची कमाई केली आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटर' आणि सर्कस प्रदर्शित झाल्यानंतर सुद्धा 'दृश्यम २' टिकून आहे. दृश्यम आणखी काही आठवडे बॉक्स ऑफिसवर टिकून राहील असे दिसत आहे. (Movie)
शनिवार आणि रविवारी 'सर्कस' चित्रपटाला गल्ला जमवता आला नाही. सर्कस चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे प्रेक्षकांनी त्यांचा मोर्चा पुन्हा 'दृश्यम २'कडे वळवला. त्यामुळे दृश्यम त्याचा फायदा झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.