The Bengal Files 
मनोरंजन बातम्या

The Bengal Files : काश्मीरने रडवले अन् बंगाल...; 'द बंगाल फाइल्स'चा धमाकेदार टीझर, पाहा VIDEO

The Bengal Files Teaser : 'द बंगाल फाइल्स' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Shreya Maskar

'द बंगाल फाइल्स: राइट टू लाइफ' चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी याआधी 'द ताशकंद फाइल्स' आणि 'द काश्मीर फाइल्स' सारखे वादग्रस्त पण वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. 'द बंगाल फाइल्स' (The Bengal Files Teaser ) हा चित्रपट आधी 'द दिल्ली फाइल्स’ या नावाने ओळखला जात होता. पण आता चित्रपटाचे नाव बदलून 'द बंगाल फाइल्स' ठेवण्यात आले आहे.

'द बंगाल फाइल्स' चा नुकताच टीझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीझरमध्ये देशाच्या इतिहासातील एक भीतीदायक बाजू दाखवण्यात आली आहे. प्रभावशाली व्हिज्युअल्स आणि भावना यांनी भरलेली ही झलक सांगून जाते की, हा चित्रपट अत्यंत परिणामकारक आणि अंतःकरणाला भिडणारा आहे.

'द बंगाल फाइल्स' स्टारकास्ट

अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी 'द बंगाल फाइल्स'ची निर्मिती केली आहे. चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार हे नावाजलेले कलाकार झळकणार आहेत. टीझरमध्ये दाखवलेले दृश्य प्रेक्षकांना अस्वस्थ करणारे आहेत. जे या कथानकाच्या खोलीची आणि वास्तवतेची झलक देतात. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या पहिल्या टीझरमध्ये मिथुन चक्रवर्ती एकटे एका ओसाड आणि अंधाऱ्या कॉरिडॉरमधून जाताना दिसतात. त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावर गंभीरता स्पष्ट दिसते. हे दृश्य प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करून जाते.

'द बंगाल फाइल्स' या चित्रपटाची कथा विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलेली असून याची निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी केली आहे. हा चित्रपट 'फाइल्स ट्रिलॉजी'चा हा शेवटचा भाग असेल. ज्यामध्ये आधीचे 'द ताशकंद फाइल्स' आणि 'द काश्मीर फाइल्स' समाविष्ट आहेत. 'द बंगाल फाइल्स' चित्रपट 5 सप्टेंबर 2025 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT