Suhana Khan, Khushi Kapoor And Agastya Nanda Film Teaser: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘द आर्चिज’ या चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे. एकाच चित्रपटातून जवळपास तीन स्टार किड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा हे तिघेही स्टार किड्स एकत्र चित्रपटात दिसणार आहेत. ‘द आर्चिज’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे.
नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला आहे. ब्राझीलमध्ये नेटफ्लिक्सच्या टुडम इव्हेंटमध्ये या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. हा टीझर प्रदर्शित होताच त्याची चर्चा सुरू झाली.
चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांसोबतच झोया अख्तर देखील दिसणार आहे. तिने या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयात डेब्यू केलंय. ‘द आर्चिज’चा नुकताच सोशल मीडियावर टीझर प्रदर्शित झाला आहे.
टीझरची सुरूवात, रिवरडेल स्थानकात एका ट्रेनच्या थांबण्यापासून सुरु होते. रिवरडेल हे भारतातील एक हिल्स स्टेशन आहे. या शहरात अनेक रेस्ट्रो कार दिसत आहेत. नंतर पुढे टीझरमध्ये, रिवरडेलमधील गँगची ओळख करुन देण्यात आली आहे. सुहानाच्या पात्राचे नाव वेरोनिका, खुशी कपूरच्या पात्राचे नाव बेट्टी आहे. दोघीही एकत्र पार्टीत डान्स करताना दिसत आहेत. त्यानंतर दोघींचेही ब्रेकअप झाल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची कथा १९६४ मधील आहे, त्यामुळे संपूर्ण रेट्रो फील देण्यात आला आहे.
नेटफ्लिक्सने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिले की, “तुम्ही त्यांना कॉमिक्समध्ये, पुस्तकांमध्ये आणि रिव्हरडेलमध्ये पाहिलं आहे. पण यावेळी त्यांना तुम्ही भारतात पाहणार आहात. ६० च्या दशकात सेट केलेला, ‘द आर्चिज’ हा चित्रपट आहे, जो सर्वांना ओळखीचा वाटेल. हा पहिला लूक.” अशा आशयाचा कॅप्शन देत त्यांनी शेअर केला आहे.
‘द आर्चिज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांनी त्याची प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. या चित्रपटात वेदांग रैना, मिहिर आहुजा, डॉट आणि युवराज मेंडा हे कलाकार देखील दिसणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.