April May 99 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Film Festival: २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; प्रेक्षकांसाठी ५६ चित्रपटांची पर्वणी

Film Festival: महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ दिनांक ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Film Festival: महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ दिनांक ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय चित्रपटांचा समावेश असून, यंदा एकूण ५६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात निवडलेले हे ५६ चित्रपट प्रभादेवीतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. बूसान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या ‘ऑन यूअर लॅप’ (पांगकू) या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

‘२२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे."गेली बावीस वर्ष या महोत्सवाने आशियाई आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यंदा माझे वडील डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर कलाकृतींचे चित्रपट दाखवणे हा आमच्यासाठी विशेष आनंदाचा क्षण आहे असं आशियाई चित्रपट फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम म्हणाले."

जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजत असलेले चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना पाहता यावेत या उद्देशाने आशियाई फिल्म फाऊंडेशन संस्थेतर्फे थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन सन २००२ पासून करण्यास सुरुवात झाली. गेली बावीस वर्ष हा चित्रपट महोत्सव मुंबई आणि ठाण्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे.

"यावर्षी ५६ निवडक चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही एक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना देणार आहोत. किर्गिस्तान देशातील चित्रपटांचा विशेष विभाग, मराठी आणि भारतीय चित्रपटांची स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे प्रदर्शन यामुळे हा महोत्सव चित्रपटप्रेमींसाठी एक उत्सव ठरणार आहे" अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. संतोष पाठारे यांनी दिली.

आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचं आकर्षण ठरणार आहे. मराठी चित्रपट स्पर्धा विभागात अकरा मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. एप्रिल मे ९९, सांगळा, गमन, गिराण, गोंधळ, किमिडीन, निर्जळी, प्रिझम, साबर बोंड, सोहळा, उत्तर या सिनेमांचा या विभागात समावेश आहे. "थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात मी दिग्दर्शित केलेला 'उत्तर' हा चित्रपट दाखवला जाणार आहे याचा मला आनंद वाटतो आहे. मराठी चित्रपटांना स्पर्धा विभागात सहभागी करून घेणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांसोबत प्रदर्शित होणे ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाची संधी आहे. असे व्यासपीठ नवीन चित्रपटकारांना प्रोत्साहन देतात." असं उत्तर चित्रपटाचे दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन म्हणाले. भारतीय चित्रपट स्पर्धा विभागात आसामी, कन्नड, मणिपूरी, मल्याळी, बंगाली, नेपाळी या भाषांमधील बारा चित्रपटांचा समावेश आहे. तसंच आशियाई स्पेक्ट्रम या विभागात चीन, जपान, हाँग काँग, तुर्की, कझाकस्तान, विएतनाम, इराण, फिलिपिन्स, थायलंड या देशातील चित्रपटांचा समावेश आहे. यावर्षी कन्ट्री फोकस या विशेष विभागात किर्गिस्तान या देशाचा समावेश आहे. किर्गिस्तानमधील समकालीन आणि पारंपरिक कथांच्या निवडक चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे.

महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्म भुषण सई परांजपे यांना 'आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार' देण्यात येणार आहे. आणि दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक आणि क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांनी दिग्दर्शित केलेले दो आँखे बारा हाथ, डॉ. कोटनीस की अमर कहानी, कुंकू, नवरंग हे चित्रपट दाखवण्यात करण्यात येणार आहे. चित्रपट प्रदर्शनासह मान्यवर ज्युरी सदस्यांबरोबर ओपन फोरम, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसह मास्टर क्लासचं आयोजनही करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

Maharashtra Live News Update: निलंगा नगरपालिकेत पराभव झालेल्या उमेदवारांने काढली, आभार रॅली, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT