'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीच्या यादीत नेहमीच प्रथम स्थानावर असते. 'ठरलं तर मग' या मालिकेने कलाकारांना खूप लोकप्रियता मिळवून दिली आहे. या मालिकेतील कलाकार कायमच चर्चेत असतात.
सध्या या मालिकेतील अभिनेत्री मोनिका दबडे (Monika Dabade) ही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मोनिकाने आलिशान कार खरेदी केली आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेत अभिनेत्री मोनिका दबडेही अर्जुनच्या बहिण दाखवली आहे. जिचे नाव अस्मिता आहे. मोनिका अस्मिता या पात्रामुळे प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली.
मोनिका इंस्टाग्रावरवर आलिशान कारसोबत फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. तिने गाडी सोबत आपले आणि नवऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. मोनिकाने या पोस्टला खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "स्वप्नपूर्ती आणि तयारी..." तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोनिकाने टाटा मोटर्सची नेक्सॉन ही गाडी खरेदी केली आहे.
२०२५ मध्ये मोनिकाच्या घरी एक पाहुणा येणार आहे. अलिकडेच मोनिकाने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मोनिका आता लवकरच आई होणार आहे. मोनिका सोशल मीडियावर खूर ॲक्टिव्ह असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.