Tharala Tar Mag Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये नवा ड्रामा; घरच्यांना भेटण्यासाठी प्रियाने रचला कट, अर्जुन-आश्विनने ऐनवेळी मोडला डाव

Tharala Tar Mag: ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रियाने घरच्यांना भेटण्यासाठी आत्महत्येचा बनाव रचला. मात्र अर्जुन आणि आश्विनने तिचा डाव उधळून लावत तिला चांगलेच सुनावले.

Shruti Vilas Kadam

Tharala Tar Mag: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील प्रत्येक भागात नवे ट्विस्ट पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2 जूनच्या भागातही असाच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून प्रियाचा आखलेला डाव अर्जुन आणि आश्विनमुळे फसणार आहे.

तुरुंगात असलेली प्रिया आपल्या घरच्यांना भेटण्यासाठी नवा मार्ग शोधत असते. तुरुंगात एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आल्याचे तिला समजते. त्यावरून प्रियाच्या मनात एक धोकादायक कल्पना येते. आपणही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा बनाव केल्यास घरचे भेटायला येतील आणि त्यांना आपल्या प्रेग्नेंसीची माहिती देता येईल, असा तिचा विचार असतो.

मात्र प्रत्यक्षात जीव धोक्यात घालण्याची भीती तिला वाटत असते. अशातच तिच्या कोठडीत आलेली दुसरी कैदी तिला एक कल्पना सुचवते. कोणीही आसपास नसताना ती पाण्याचा माठ फोडते आणि त्यातील काचेच्या तुकड्याने हाताला किरकोळ जखम करण्यास सांगते. त्यानंतर तिची मैत्रीण मोठ्याने आरडाओरडा करून प्रियाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गोंधळ घालते. प्रियाचा डाव यशस्वी झाल्याचे तिला वाटते आणि घरच्यांना फोनही केला जातो.

दरम्यान, सुभेदार कुटुंबात वेगळीच परिस्थिती निर्माण होते. कल्पनाला एका अनोळखी नंबरवरून फोन येतो. फोन पाहून अर्जुनला संशय येतो की हा कॉल तुरुंगातून प्रियानेच केला असावा. मात्र फोन उचलल्यानंतर समोर वेगळीच बातमी येते. कल्पनाच्या एका मैत्रिणीच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजल्याने ती भावूक होते. त्यामुळे प्रियाचा प्लॅन पुन्हा एकदा फसतो.

यानंतर अर्जुन आणि आश्विन थेट तुरुंगात प्रियाला भेटायला पोहोचतात. घरातील इतर कोणीही न आल्याने प्रियाचा हिरमोड होतो. आश्विन स्पष्ट शब्दांत सांगतो की, हा सर्व प्रकार घरच्यांना बोलावण्यासाठी रचलेला बनाव असल्याचे त्यांना आधीच समजले होते.

अर्जुन डॉक्टरांकडून जखमेबाबत माहिती घेतो. डॉक्टर सांगतात की जखम अत्यंत किरकोळ असून जीवाला कोणताही धोका नव्हता. त्यानंतर अर्जुन प्रियाला खडसावतो आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप करतो. तिच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्याची चेतावणी देताच प्रिया घाबरते आणि त्याच्याकडे विनवण्या करू लागते. त्यामुळे मालिकेत पुढे कोणता नवा ट्विस्ट येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोहगड खून प्रकरणी केतन अग्रवालच्या आईचं पंतप्रधानांना पत्र

Gold Price Today : खुशखबर! सोनं ₹1,000 ने तर चांदीत ₹16000 स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतले आजचे ताजे दर

Shocking : तरुणीचा भाओजीवर जीव जडला, लग्नाच्या ३ दिवसाआधी होणाऱ्या नवऱ्याला संपवलं; सियानंतर उर्मिलाचं हादरवणारं कृत्य

Ulhasnagar Accident: उल्हासनगरमध्ये हिट अँड रनचा थरार! मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा मृत्यू; प्रसिद्ध व्यापाऱ्याला अटक

वाढीव वीजबिलांवर मनसे आक्रमक! २ हजार तक्रारींसह महावितरणला इशारा

SCROLL FOR NEXT