Tharala Tar Mag Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये नवा ट्विस्ट! सत्य समोर आणण्यासाठी सायलीचा जीवघेणा प्लॅन

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'च्या 29 जूनच्या भागात सायलीचा धोकादायक प्लॅन राकेशला समजतो, तर अस्मिताचा पहिल्याच दिवशी जॉब जातो. मालिकेत नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Tharala Tar Mag: स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका 'ठरलं तर मग' मालिकेच्या 29 जून 2026 च्या भागात प्रेक्षकांना एकामागून एक धक्कादायक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. सायली तिच्या भूतकाळाशी संबंधित सत्य समोर आणण्यासाठी मोठा प्लॅन आखते, तर दुसरीकडे अस्मिताच्या आयुष्यातही मोठे संकट उभे राहते. त्यामुळे आगामी भाग अधिकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.

एपिसोडच्या सुरुवातीलाच सायली रविराज आणि प्रतिमा आत्याला तिच्यासोबत बाहेर येण्याची विनंती करते. मात्र कुठे जायचे हे ती कोणालाही सांगत नाही. ती त्या दोघांना तिच्या जुन्या अपघाताची आठवण पुन्हा करून देण्याचा प्रयत्न करत आहे. रविराज आणि प्रतिमा तिच्यावर विश्वास ठेवून तिच्यासोबत जाण्यास तयार होतात.

दरम्यान, राकेशने सायलीच्या या प्लॅनची माहिती तुरुंगात असलेल्या नागराजला दिलेली असते. नागराजला भीती असते की सायलीला तिची खरी ओळख म्हणजेच तन्वी असल्याचे आठवले. असे झाले तर दादा संपूर्ण प्रोपर्टी तिच्या नावावर करेल. त्यामुळे हा प्लॅन कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ द्यायचा नाही असा निर्धार राकेश करतो. इतकेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा काटा काढण्याचाही त्याचा भयानक डाव असल्याचे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होते.

दुसरीकडे, अस्मिताला मिळालेल्या नोकरीच्या ऑफरवरून घरात नवा वाद रंगतो. कल्पना अस्मिताच्या निर्णयावर नाराज असते. लहान बाळाला सोडून नोकरी करण्याचा विचार चुकीचा असल्याचे ती सांगते. मात्र अस्मिता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा निर्णय घेते. व्यक्त करते. याचदरम्यान पूर्णा आजींना सायलीची आठवण येते. त्या आणि अस्मिता सायलीला भेटायला जाण्याचा निर्णय घेतात.

मात्र अस्मिता सायलीकडे जाण्याची तयारी करत असतानाच तिच्या नव्या नोकरीवरून फोन येतो. पण फोनवर पहिल्याच दिवशी तिची नोकरी गेल्याचे सांगितले जाते. आता सायलीचा प्लॅन यशस्वी होणार का आणि अस्मिताची नोकरी नेमकी का गेली, याची उत्सुकता पुढील भागात शिगेला पोहोचणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोनम वांगचुक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला हिंगोलीतून पाठिंबा

Headache - Knee Pain : गोळ्या खाण्याची गरजच नाही! पायाचं दुखणे अन् डोकेदुखी दूर करेल २ मिनिटांचा 'हा' सोपा उपाय

पावसाळ्यात बनवा मस्त चमचमीत आलू- मटार भाजी, जेवणाला येईल चव

Jalgaon : पोहण्याचा मोह जीवावर बेतला , कुटुंबियांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या शब्दाखातर अभिजीत दीपकेंनी सोडलं उपोषण; थेट संसद मार्चमध्ये झाले सामील

SCROLL FOR NEXT