Leo Movie Leaked Online Saam Tv
मनोरंजन बातम्या

Leo Online Leak: विजय थलपतीला मोठा झटका, प्रदर्शित होताच ‘लिओ’ झाला लीक; चित्रपटाच्या कमाईवर होणार परिणाम?

Vijay Thalapathy Leo Online Leak: चित्रपटाला पहिल्याच दिवशी धडाकेबाज प्रतिसाद मिळत असून निर्मात्यांना मोठा दणका बसला आहे.

Chetan Bodke

Leo Movie Leaked Online

सध्या लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘लिओ’ चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. विजय थलापती मुख्य भूमिकेत असलेला ‘लियो’ आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने जगभरामध्ये ॲडव्हान्स बुकिंगचे विक्रम केले होते. चित्रपटाला पहिल्याच दिवशी धडाकेबाज प्रतिसाद मिळत असून निर्मात्यांना मोठा दणका बसला आहे.

थलापती विजयचा ‘लिओ’ चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला असून अवघ्या काही तासातच चित्रपट ऑनलाईन लिक झाला आहे. अवघ्या काही वेळातच चित्रपट ऑनलाईन लिक झाल्यामुळे निर्मात्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या चित्रपटाची एचडी प्रिंट ऑनलाईन व्हायरल झाल्याने निर्मात्यांनी आता संबंधितांविरोधात आक्रमक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी अनेक महत्वाच्या चित्रपटांबाबत हा प्रकार घडल्याचे दिसून आला आहे. त्यामुळे निर्मात्यांना मात्र मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे.

टॉलिवूड फिल्म ट्रेड ॲनालिस्ट विजय मनोबालाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर चित्रपट ऑनलाईन लिक झाल्याची माहिती दिली आहे. विजय मनोबाला आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “धक्कादायक, धक्कादायक... ‘लिओ’ चित्रपट एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे.” Movierulz, Filmyzilla, Tamil Rockers, Telegram आणि 123 Movies या ऑनलाईन साईड्सवर चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे. अशाप्रकारे चित्रपट ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे त्याचा तोटा निर्मांत्याबरोबरच कलाकारांना देखील सहन करावा लागतो. (Social Media)

‘लिओ’ हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. चित्रपटाची पटकथा रत्नाकुमार आणि धीरज वैद्य यांनी लिहिली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सर्जा, मायस्किन, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान, प्रिया आनंद आणि सँडी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘लिओ’ चित्रपटाची निर्मिती सेव्हन स्क्रीन स्टुडिओने केली असून अनिरुद्ध रविचंदरने संगीत दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT