Thalapathy Vijay saam tv
मनोरंजन बातम्या

Thalapathy Vijay: जन नायकन! थलापथी विजयचा ३३ वर्षांच्या फिल्मी करिअरला रामराम, पूर्णवेळ राजकारणात होणार सक्रिय

Thalapathy Vijay: थलापथी विजय यांनी चित्रपटसृष्टीला निरोप देत पूर्णपणे राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘जन नायकन’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे.

Shruti Vilas Kadam

Thalapathy Vijay: तामिळ सिने जगताचा दिग्गज अभिनेता थलापथी विजय यांनी ३३ वर्षांच्या दीर्घ आणि यशस्वी करिअर नंतर चित्रपटसृष्टीला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘जाना नायकन’ च्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला आणि पुढे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

२७ डिसेंबर २०२५ रोजी मलेशियात आयोजित ‘थलपथी थिरुविझा’ या विशेष इवेंटमध्ये विजयने भावनिक भाषणात सांगितले की त्यांचा अभिनय कारकिर्दीचा शेवटचा टप्पा ‘जाना नायकन’ असेल आणि यानंतर ते राजकारणात पूर्ण वेळ काम करतील. ते म्हणाले, “फॅन्सने मला जे काही दिले त्यासाठी मी सिनेमाला अलविदा म्हणतो आणि त्यांच्या सेवेसाठी राजकारणात प्रवेश करतो.”

विजयने त्यांच्या भाषणात सांगितले की त्यांनी ‘सिनेमात प्रवेश केल्यावर मी फक्त एक लहान वाळूचं घर उभं केलं’ आणि प्रेक्षकांनी त्याला महाल बनवला’ असे सांगत त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. त्यांनी स्पष्ट केले की आता ते लोकसेवा आणि समाजाच्या हितासाठी राजकीय कार्यात जीवन समर्पित करणार आहेत.

जान नायकन’ हा चित्रपट आगामी ९ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज आहे आणि या चित्रपटामुळे विजय सिनेमातून राजकीय प्रवासाकडे वळणार आहेत. या चित्रपटात पूजा हेगडे, बॉबी देओल, प्रकाश राज आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा टीमची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा मिळवला जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT