‘ठाकुर सज्जन सिंह’ फेम अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन Instagram/anupamshyamojha
मनोरंजन बातम्या

‘ठाकुर सज्जन सिंह’ फेम अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन

मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचे निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - अनेक चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिकांमध्ये Tv Serial आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या ‘ठाकुर सज्जन सिंह’ फेम अभिनेते अनुपम श्याम Anupam Shyam यांचे निधन झाले आहे. बऱ्याच काळापासून अनुपम श्याम हे आजारी होते. रविवारी सांयकाळी त्यांचे निधन झाले आहे. मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यानच्यावर मुंबईमधील Mumbai लाइफ लाइन रुग्णालयामध्ये Hospital उपचार सुरु होते. काल रात्री आठच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली आणि मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचा मृत्यू झाला.

हे देखील पहा -

मन या लोकप्रिय मालिकेला त्यांनी दिलेला आवाज आणि त्यासोबतच प्रतिज्ञा या मालिकेमधील ठाकुर सज्जन सिंह यामुळे अनुपम यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.अनुपम यांनी दस्तक, हजार चौरासी की मां, दुश्मन, सत्या, दिल से, जख्म, संघर्ष, लगान, नायक, शक्ति, पाप, जिज्ञासा सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत आपली एक वेगळी आणि अनोखी ओळख निर्माण केली आहे.

प्रतिज्ञा या मालिकेमुळे अनुपम घराघरात पोहचले. या मालिकेत त्यांनी ठाकुर सज्जन सिंहची भूमिका साकारली होती. आता अनुपम यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रामध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अनुपम श्याम यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणले की, 'दिग्गज अभिनेता अनुपम श्याम यांचं मल्टिपल ऑर्गन फेलिअरमुळे निधन झालं. हे सिनेसृष्टी आणि टीव्ही जगताचं मोठं नुकसान आहे.'

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

lalbaugcha raja : ...अन् अंबानींचे सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवांनी तराफा पाण्यात ढकलला; लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज, VIDEO

Daily Horoscope: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; वाचा तुमचे राशीभविष्य

Pregnancy: गरोदर महिलांनी चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नये, कारण...

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब का झाला?

Maharashtra Live News Update: पुराच्या पाण्यात चारचाकी वाहन वाहून गेलं

SCROLL FOR NEXT