Kalpana Raghavendar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kalpana Raghavendar : गायिकेच्या घराचं दोन दिवस दार बंद, दरवाजा तोडल्यानंतर आतलं दृश्य पाहून सर्वच हादरले

Singer Kalpana Raghavendar : प्रसिद्ध गायिका कल्पना राघवेंद्र हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध तेलुगू गायिका कल्पना राघवेंद्र (Kalpana Raghavendar) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांनी हैदराबादमधील राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायिका कल्पना राघवेंद्र यांचे घर दोन दिवसांपासून बंद होते. कल्पना राघवेंद्र ने आत्महत्या केली यावेळी तिचा नवरा चेन्नईमध्ये होता.

घर बंद असल्यामुळे पोलीसांनी घटनास्थळी दरवाजा तोडून आत गेले. तेव्हा त्यांना गायिका कल्पना राघवेंद्र बेशुद्ध अवस्थेत पाहायला मिळाली. ती बेडवर पडली होती. पोलिसांनी कल्पना राघवेंद्र यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेलुगू गायिका कल्पना राघवेंद्र यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या कल्पना यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायिका कल्पना राघवेंद्रचे घर दोन दिवस बंद असल्याची माहिती पोलीसांना मंगळवारी मिळाली आणि त्यांनी तिच्या घरी धाव घेतली. पोलिसांना कल्पनाच्या सुरक्षा रक्षकांना संपर्क केल्याचे सांगितले जात आहे. सध्या कल्पना राघवेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गायिका शुद्धीवर आल्यावर तिच्याशी संवाद साधतील आणि नेमका प्रकार काय घडला हे जाणून घेतील.

तेलुगू गायिका कल्पना राघवेंद्र आजवर अनेक हिट गाणी गायली आहेत. आपल्या गाण्याने तिने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. कल्पनाने वयाच्या पाचव्या वर्षीपासून गायनाला सुरूवात केली. कल्पनाने 2010 मध्ये 'स्टार सिंगल्स मल्याळम' हा शो जिंकून खूप लोकप्रियता मिळवली. तिने ए.आर. रहमान यांसारख्या मोठ्या गायकासोबत काम केले आहे. कल्पना ही उत्तम अभिनेत्री आहे. कल्पनाने बिग बॉस तेलुगू'मध्येही पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT