Salaar 3rd Day Box Office Collection You Tube
मनोरंजन बातम्या

Salaar 3rd Day Collection: प्रभासच्या ‘सालार’ने पहिल्याच विकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस, आता ५०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल

Salaar Box Office Collection: प्रभास ‘आदिपुरुष’नंतर ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर सर्वांनाच ‘सालार’बद्दल उत्सुकता होती.

Chetan Bodke

Salaar 3rd Day Box Office Collection

नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रभासचा ‘सालार’ चित्रपट रिलीज झाला आहे. प्रभासच्या ‘सालार’ने पहिल्याच विकेंडला अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढत शिरपेचात मानाचा तुरा रोवला. प्रभास ‘आदिपुरुष’नंतर ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘आदिपुरुष’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर सर्वांनाच ‘सालार’बद्दल उत्सुकता होती. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. चला तर जाणून घेऊया, चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल...

रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 'जवान', 'पठान', 'गदर २' आणि 'ॲनिमल'चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. प्रभासने ‘आदिपुरुष’मध्ये केलेल्या अभिनयामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता. पण प्रभासने ‘सालार पार्ट 1: सीझफायर’मधून त्याने सर्वांचीच बोलती बंद केली आहे. प्रभासच्या दमदार अभिनयाने आणि अफलातून ॲक्शनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रशांत नील दिग्दर्शित चित्रपटाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल ११२ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी ५६. ३५ कोटींची कमाई तर, तिसऱ्या दिवशी ६१ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटासाठी प्रभासच्या अभिनयाचे जितके कौतुक होत आहे, तितकेच त्याला ट्रोल सुद्धा केले आहे. पण सहसा प्रभासला या चित्रपटातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांमध्ये चित्रपटाने एकूण २०८. ०५ कोटींची कमाई केली आहे. 'सालार'ने पहिल्याच विकेंडला २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने २९५. ७ कोटींची कमाई केली आहे.

'सालार'बद्दल चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ पाहायाला मिळत आहे. चित्रपट नक्कीच १००० कोटींचा टप्पा पार करेल असं अनेक चाहत्यांनी सांगितले. 'KGF 1' आणि 'KGF Chapter 2' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी ‘सालार पार्ट 1: सीझफायर’चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचे कथानक दोन भागांमध्ये विभाजित केली असून हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रृती हासन, बॉबी सिम्हा आणि जगपती बाबू प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: २० वेळा फेल, एकदा नव्हे तर दोनदा UPSC पास; विवेक यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Coffee Pudding Recipe: विकेंडला लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी कॉफी पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : माणगाव, इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार

IAS Transferred: सात वरिष्ठ IAS आणि PCS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल

Nauvari Saree Blouse Patterns: नऊवारी साडीवर उठून दिसतील हे 8 ट्रेंडिंग ब्लाउज पॅटर्न; गुढीपाडव्याला तुमच्यावर खिळतील लोकांच्या नजरा

SCROLL FOR NEXT