Rakesh Master Passes Away  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakesh Master Passes Away: टॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध कोरिओग्राफरचे निधन, वयाच्या 53 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Tollywood Choreographer Death: राकेश मास्टर यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत.

Priya More

Telugu Film Industry: गेल्या काही दिवसांपासून टॉलिवूडमधील (Tollywood) एकापाठोपाठ एका सेलिब्रिटीच्या निधनाचे वृत्त समोर येत आहे. या सेलिब्रिटींच्या निधनाच्या दु:खातून सावरत नाही तोवर टॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध तेलुगू कोरिओग्राफर राकेश मास्टर यांचे निधन (Rakesh Master Passes Away) झाले आहे.

वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राकेश मास्टर यांच्या निधनामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर (South Film Industry) शोककळा पसरली आहे. राकेश मास्टर यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत.

राकेश मास्टर हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध कोरिओग्राफरांपैकी एक होते. राकेश मास्टर विशाखापट्टणममध् आऊटडोअर शूटिंग पूर्ण करुन एका आठवड्यांपूर्वी हैदराबादला परतले होते. हैदराबादला आल्यानंतर ते आजारी पडले. प्रकृतीमध्ये जास्त बिघाड झाल्यामुळे त्यांना हैदराबाद येथील गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारानंतर त्यांचे निधन झाले. डॉक्टरांना सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही.

रविवारी संध्याकाळी राकेश मास्टर यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, राकेशच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तसंच गंभीर चयापचयातील ऍसिडोसिसने देखील ते त्रस्त होते.' राकेश मास्टर यांच्या निधनामुळे तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राके यांच्या अचानक निधनामुळे त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवासोबतच चाहत्यांना मोठा धक्का बसला.

राकेश मास्टर यांचे खरे नाव एस, रामाराव होते. त्यांनी डान्स मास्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. राकेश मास्टर यांनी 'आटा' आणि 'धी' सारख्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेऊन करिअरची सुरुवात केली होती. जबरदस्त डान्स शैलीमुळे त्यांना कमी वयात तेलुगू चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळाला. त्यांनी अनेक हिट गाण्यांना कोरिओग्राफ केले आहे. आपल्या जबरदस्त कारकिर्दीत त्यांनी 1500 हून अधिक चित्रपटांमधील गाणी कोरिओग्राफी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT