Karan Deol Wedding
Karan Deol WeddingSaam tv

Bobby Deol-Karan Deol: बॉबी देओलने नव्या सुनेचे केलं जोरदार स्वागत, देओल कुटुंबात आनंदाचा उत्सव, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

Karan Deol Wedding: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. करणने बिमल राय यांची नात द्रिशा आचार्यसोबत विवाह केला असून मागील काही दिवसांपासून यांच्या लग्नाची चर्चा होत होती. सध्या सोशल मीडियावर या नवीन कपलच्या लग्नाचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

 Karan Deol Wedding
Shanta Tambe Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे काळाच्या पडद्याआड, ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

१८ जून देओल कुटुंबासाठी आनंदाचा दिवस होता. या दिवशी सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्रचा नातू करण लग्नबंधनात अडकला. ताज लॅंड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी या विवाहसोहळ्यास उपस्थित होती. देओल कुटुंबीयांनी सुनेचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(Entertainment Marathi News)

 Karan Deol Wedding
Kajal Agrawal Birthday: ‘बॅकग्राउंड डान्सर’ ते प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री; कसा आहे काजलचा सिनेसृष्टीतील खडतर करिअरचा प्रवास

सोशल मीडियावर करणच्या रिसेप्शनचे फोटो- व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्हिडीओमध्ये सनी देओल, बॉबी देओल, आजोबा धर्मेंद्र, अभय देओल, राजवीर देओल सर्वच ढोल-ताशावर नाचताना दिसत आहेत. तर बॉबी देओलच्या आनंद गगनात मावेनासा झाला होता.

बॉबी देओलने पुतण्याच्या लग्नात खूप धम्माल केली आहे. नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत बॉबीने, "देओल कुटुंबात नवीन कन्येचे स्वागत ... करण आणि द्रिशा यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा" असं कॅप्शन दिले आहे.

बॉबीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये, बॉबी देओल पत्नी तान्या देओल नव विवाहित जोडप्यासोबत दिसत आहेत. आणखी एका फोटोमध्ये अभिनेता बॉबी करणच्या (पुतणा) गालावर किस करत प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो आहे.

करणच्या लग्नासाठी संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होते. परंतु धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली- ईशा आणि आहाना या लग्नसोहळ्यास उपस्थित नव्हत्या. मिळालेल्या माहितीनुसार, हेमा मालिनी आपल्या पहिल्या पतीच्या कुटुंबियांशी जास्त संपर्कात नाहीत आणि यामुळेच हेमा या लग्नसोहळ्याला उपस्थित नव्हती. तर, सनीने दोन्ही बहिणींना म्हणजे ईशा आणि आहाना यांना लग्नाचे आमंत्रण पाठवले होते तरी त्यादेखील उपस्थित नव्हत्या.

कोण आहे सनी देओलची सून द्रिशा आचार्य?

सनी देओलची सून द्रिशा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात तज्ञ आहे आणि सध्या दुबईतील एका ट्रॅव्हल कंपनीसाठी नॅशनल प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत आहे. करण आणि द्रिशा हे बालपणीचे मित्र आहेत. मागील अनेक वर्षापासून करण आणि द्रिशा एकमेकांना डेट करत आहेत. आता हे दोघे लग्नबंधनात अडकले आहे. द्रिशा ही फॅशन डिझायनर असून ती देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबातून आहे. तिचे पणजोबा बिमल रॉय हे महान भारतीय चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जातात. बिमल रॉय यांचे चित्रपट वास्तववादी आणि समाजवादी विषयांसाठी ओळखले जायचे. दो बिघा जमीन, परिणीता, देवदास, मधुमती, सुजाता, पारख आणि बंदिनी यांसारख्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

करणने २०१९ मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तो ‘अपने 2’ या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्रसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com