Madhura Velankar On Theaters: मराठी सिनेमासाठी अभिनेत्रीनं उठवला आवाज; मनातली सर्वात मोठी खदखदही बोलून दाखवली

Madhura Welankar News: मराठी सिनेमासाठी अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने आवाज उठवला असून मनातील खदखद देखील तिने यावेळी बोलून दाखवली.
Madhura Velankar On Theaters
Madhura Velankar On TheatersSaam Tv
Published On

Madhura Velankar Comments: “कुठलीही मोठी कंपनी कुठलाही मोठा निर्माता कुठलाही स्टुडिओ पाठीशी नसताना, एक साधी सरळ सोपी गोष्ट अगदी साध्या सरळ पद्धतीने, मराठीचा स्वाद कायम ठेवून, सगळ्यांना आवडेल, अख्ख कुटुंब पाहू शकेल अशा पद्धतीचा सिनेमा जर तयार केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला तर प्रेक्षक प्रेक्षागृहात येतात. ” असा विश्वास मधुरा वेलणकरने व्यक्त केला.

Madhura Velankar On Theaters
New Movie Poster : शाहिद-क्रितीच्या नव्या रोमँटिक सिनेमाचं पोस्टर आलं समोर, रिलीज डेटही ठरली; फॅन्स मात्र वेगळ्याच कारणाने लागले कामाला

सर्व समीक्षकांनी सर्व प्रेक्षकांनी अनेक दिग्गज मंडळींनी या सिनेमाचं कौतुकच केलं! "आवर्जून बघावा असा हा सिनेमा,खूप वर्षांनी असा सिनेमा मराठीत आला, आम्ही परत परत पाहणार,प्रत्येक बाईने प्रत्येक नवऱ्याने प्रत्येक कुटुंबाने पाहायलाच हवा असा हा चित्रपट, आजच्या धकाधकीमधे आणि भपकेबाज गोष्टीं चालू असताना हा चित्रपट तुम्हाला सुखावून जातो, तुम्हाला सगळी बक्षीसं मिळायला हवी , प्रत्येकाला आपला वाटेल आपल्याशी रिलेट होईल आपणच आपलीच गोष्ट पाहतोय असं वाटेल" अशा विविध पद्धतीच्या सकारात्मक प्रतिक्रिया या चित्रपटाला मिळाल्या आणि मिळत आहेत.

मराठी चित्रपटांविषयी मधुरा म्हणते, “मराठी चित्रपटांच्या गर्दीत इंग्रजी चित्रपटांच्या लाटेत आणि अतिशय मोठ्या अशा हिंदी चित्रपटांच्या तोडीला हा चित्रपट उभा राहिला. तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा पुण्यामध्ये ह्याचे हाउसफुल खेळ चालू आहेत. ही पसंती प्रेक्षकांनीच या चित्रपटाला दिली असून अनेकांना हा चित्रपट पाहायचा आहे. मराठी चित्रपटाचा प्रेक्षक हा माऊथ पब्लिसिटी वर म्हणजेच एकाने दुसऱ्याला सांगून वाढत जातो, या अशा पद्धतीने मराठीला प्राईम- टाईम मिळणं ही फार महत्त्वाची बाब असते.”

Madhura Velankar On Theaters
Bobby Deol-Karan Deol: बॉबी देओलने नव्या सुनेचे केलं जोरदार स्वागत, देओल कुटुंबात आनंदाचा उत्सव, व्हिडिओ व्हायरल

मधुरा पुढे मराठी चित्रपटाविषयी म्हणते, “निदान महाराष्ट्रात तरी, जेव्हा मल्टिप्लेक्स म्हणतो, तेव्हा अनेक स्क्रीन असतात. त्यातली निदान एक स्क्रीन महाराष्ट्रातल्या मराठी सिनेमांसाठी राखीव असली पाहिजे, कारण कुठलाही मोठा चित्रपट हिंदी, इंग्रजी आला की मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही, मराठी प्रेक्षकांना पहाता येईल अशा वेळा उपलब्ध होत नाही. मराठीचा तिकीट दर हा कमी असतो आणि हिंदी इंग्रजीचा जास्त असतो त्यामुळे ही गत होते. परंतु प्रेक्षक येतात का तर येतात!!”

“चांगलं दाखवलं चांगलं केलं तर त्याची दखल घेतली जाते, हे आपल्याला ‘बटरफ्लाय’ सारख्या चित्रपटाने पुन्हा एकदा दाखवून दिले. असेच उत्तम उत्तम चित्रपट मराठीत येवो आणि मराठीला थिएटर्स मिळो हेच मागणे.” अशा उत्तम शब्दात तिने आपले मत मांडले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com